मुंबई,
दि. ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि., मार्फत महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही राज्य विद्युत कंपन्यांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांसाठी मेडिक्लेम योजना सुरू करण्यात येत असून या योजनेला 11 नोव्हेंबर 2016 पर्यन्त पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे येथील दि. ओरिएंटल इंशुरन्स कंपनी लि., या कंपनीच्यावतीने तिन्ही वीज कंपन्यांतून सेवानिवृत्त झालेल्या व वयवर्षे 70 पर्यन्त असलेल्या कर्मचार्यांसाठी नवीन मेडिक्लेम पॉलीसी राबविण्यात येत आहे. एक हजार कर्मचार्यांसाठी पॉलिसीचा प्रस्ताव असून आतापर्यन्त 800 लोकांनी रजिस्ट्रेशन केले. रजिस्ट्रेशन केलेल्यांपैकी फक्त 246 जणांनी प्रिमियम भरल्यामुळें या पॉलिसीचा जास्तीत जास्त सेवानिवृत्त कर्मचार्यांनी लाभ घ्यावा यासाठी या योजनेची मुदत 11 नोव्हेंबर 2016 अशी वाढविण्यात आली आहे.
इच्छुक सेवानिवृत्त वीज कर्मचार्यांनी मेडिक्लेम योजनेचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर नजीकच्या अॅक्सीस बँक शाखेत आपला नोंदणी क्रमांक नमूद करून “EASYPAY” दि ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी या खात्यावर विमा हप्ता जमा करावा. या योजनेचा माफक विमा हप्ता भरून इच्छुकांना सहभागी होता येईल. तसेच पॉलिसीची रक्कम एक, दोन आणि तीन लाख रुपये मर्यादित असून कर्मचार्यांच्या सोयीनुसार निवडीस पर्याय आहे.
पॉलीसी नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया http://msebretired.mdindia.


