महावितरणच्या थेट संपर्काला प्रतिसाद देत वीजग्राहकांकडून 100 कोटींचा भरणा

Date:

पुणे : वीजबिलांचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून पुणे परिमंडलातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांशी मोबाईलद्वारे थेट प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना चालू व थकीत देयके भरण्याची विनंती करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील 68 हजार वीजग्राहकांनी आतापर्यंत 99 कोटी 61 लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

पुणे परिमंडलात लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल व मे तसेच जून महिन्यामध्ये वीजबिलांचा भरणा 50 टक्क्यांपर्यंत खालावला होता. त्यानंतर जुलैपासून वीजबिलांचा भरणा वाढला असला तरी सद्यस्थितीत पुणे परिमंडलामधील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 11 लाख 65 हजार ग्राहकांकडे 794 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीच्या अशा बिकट स्थितीत ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून वीजबिलांच्या थकीत रकमेचा भरणा करण्याची विनंती महावितरणकडून करण्यात येत आहे. यासोबतच वीजबिलांबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास त्याचेही निवारण करण्यात येत आहे.

      थेट संपर्क साधून वीजबिलांचा भरणा करणाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत पुणे परिमंडलातील 68 हजार 300 थकबाकीदारांनी 99 कोटी 61 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे शहरातील 26 हजार 725 ग्राहकांनी 43 कोटी 60 लाख, पिंपरी व चिंचवड शहरातील 16 हजार 900 ग्राहकांनी 23 कोटी 90 लाख आणि आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी व वेल्हे तालुक्यातील 24 हजार 700 ग्राहकांनी 32 कोटी 10 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

वीजग्राहकांना ‘अनलॉक’नंतर मीटर रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात येत आहे. यापूर्वी ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत निर्माण झालेला संभ्रम महावितरणकडून दूर करण्यात आला आहे. वीजक्षेत्रातील तज्ञांनी सुद्धा रिडींगप्रमाणे तीन ते चार महिन्यांचे एकत्रित दिलेले वीजबिल अचूक असल्याचा निर्वाळा दिला आहे. लॉकडाऊनमधील वीजबिलांबाबत शंका निरसन करण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत गेल्या जूनपासून आतापर्यंत 97 वेबिनार व 115 मेळावे घेण्यात आले तर 286 ठिकाणी ग्राहक मदत कक्ष स्थापन करण्यात आले. यामध्ये सुमारे 4 लाख 2 हजार वीजग्राहकांचे शंका समाधान करण्यात आले आहे. मीटर रिडींगप्रमाणे देण्यात आलेले वीजबिल अचूक असल्याचे ग्राहकांनी देखील मान्य केले आहे. तरीही वीजबिल नियमित भरण्याचे प्रमाण वाढलेले नसल्याने थकबाकीमध्ये मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांशी थेट मोबाईलद्वारे प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना थकबाकी भरण्याची विनंती करण्यात येत आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना, ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुणे परिमंडलात अहोरात्र ग्राहकसेवा देण्यात येत आहे. मात्र वीजबिलांचा व थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे. अशा बिकट परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्यकरून थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु आहेत. यासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपद्वारे तसेच इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा घरबसल्या करण्याची सोय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहा महिन्यांत रेल्वे तिकिटांच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

आजपासून तुमचा रेल्वे प्रवास महाग झाला आहे. गेल्या सहा...

शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात:मंत्री संजय शिरसाटांचे मोठे विधान

आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल छत्रपती संभाजीनगर-महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

पीएमआरडीए मुख्यालयात ‘वीर बाल दिन’; साहिबजाद्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

पुणे : धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेसाठी अल्पवयातच सर्वोच्च बलिदान...

महापालिकांसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक मैदानात

मुंबई दि. २५ डिसेंबर - राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक...