कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

Date:

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महावितरणला आपल्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश राज्याचे उर्जामंत्री, डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले असून ग्राहकांशी रोजचा होणारा संपर्क टाळण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
23 मार्चपासून मीटर रिडींग करण्यासाठी व बिलाचे वितरण करण्यासाठी ग्राहकांच्या घरी पुढील आदेश येईपर्यंत जाऊ नये.  या काळात मीटर रिडींग न झाल्यामुळे ग्राहकांना सरासरी बिल पाठविण्याची सूचना त्यांनी दिल्यात. या काळात वीज बिलाची छपाई करण्यात येणार नाही. तथापि महावितरणच्या वेबसाईटवर बिले उपलब्ध करून देण्यात यावी, असेही त्यांनी आदेश दिले आहेत. सोबतच ग्राहकांनी महावितरणकडे नोंदविलेल्या मोबाईल नंबरवर बिलासंबंधीचे एस.एम.एस.संदेश पाठविण्यात येणार आहे.
या कालावधीत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे व  ग्राहकांच्या विजेबाबतच्या तक्रारी ।स्वतःची योग्य काळजी घेऊन निवारण करावे, अशा  सूचना डॉ. राऊत यांनी महावितरण प्रशासनाला दिल्या आहेत.
करोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रात मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यामुळे आपली तक्रार टोलफ्री नंबरवर नोंदविण्यासाठी विलंब लागू शकतो. आपण आपल्या वीजपुरवठ्याबाबतच्या तक्रारी महावितरण पोर्टल व मोबाइल अॅपद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन डॉ. राऊत  यांनी केले आहे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लाडक्या बहिणींनो बँक खाते चेक करा!:जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जानेवारी...