एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमात 11 गावांमध्ये 553 कामे पूर्ण – महावितरणची पुणे ग्रामीणमध्ये धडक मोहीम

Date:

पुणे : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या एक दिवसीय त्रिसुत्री मोहिममध्ये पुणे ग्रामीण मंडलातील लोणावळा शहरासह 11 गावांमध्ये 553 विविध कामे करण्यात आली आहेत.

ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत एकदिवसीय त्रिसुत्री उपक्रम सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत कळंब, नांदुर, टाकेवाडी, साकोरे (घोडेगाव उपविभाग), अवसरी बुद्गुक, अवसरी खुर्द व लगतच्या दोन वाड्या (मंचर उपविभाग), कुंजीरवाडी व उरळी कांचन (उरळी कांचन उपविभाग), रामनगर, भूशी, खोंडकेवाडी व लोणावळा शहर परिसर (लोणावळा उपविभाग), कुरकुंडी (राजगुरुनगर उपविभाग), आपटाळे (जुन्नर उपविभाग) या गावांमध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण 445 कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्‍या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे, फिडर पिलरला झाकणे लावणे आदी कामांचा समावेश आहे.

याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे अशा प्रकारची 57 कामे करण्यात आली तर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 51 ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यासोबत गावकऱ्याांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांसह महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा, मोबाईल अ‍ॅप आदींची माहिती देण्यात आली व वीजसुरक्षेबाबत प्रबोधनही करण्यात आले.

एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंदेले (मुळशी), किशोर गोरडे (राजगुरुनगर), प्रकाश खांडेकर (मंचर), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. उमेश चव्हाण (लोणावळा) तसेच उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), प्रदीप सुरवसे (उरळी कांचन) मनीष कडू (राजगुरुनगर), जयंत गेटमे (जुन्नर), सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह जनमित्र या उपक्रमात सहभागी झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नदीच्या पात्रातून कचरा अन मेट्रोचे भंगार पावसाळ्यापूर्वी काढून सफाई कधी होणार ?

पुणे- नाल्यांची सफाई नेहमीच माध्यमांतून गाजते पण नदी जीला...

‘माजी रणजीपटू’ निघाला सायबर चोर,32 लाखांच्या ‘डिजिटल अरेस्ट’ प्रकरणी 7 जण जेरबंद

मुंबई-क्रिकेटचे मैदान गाजवणारा माजी रणजीपटू ऋषी तुषार आरोठे सायबर...

पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देणार ,त्यांचे सर्व प्रश्न सोडविणार -महापौर

पुणे-महापालिका हद्दीतील प्रत्येक पात्र पथारी व्यवसायिकास बारकोड/क्यूआर कोड आधारित...

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...