Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजमीटर मुबलक प्रमाणात उपलब्ध स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका – महावितरणचे आवाहन

Date:

पुणे पश्चिम महाराष्ट्रात नवीन वीजजोडण्या व नादुरुस्त वीजमीटर बदलण्यासाठी महावितरणच्या कार्यालयांमध्ये सद्यस्थितीत सिंगल व थ्री फेजचे 1 लाख 14 हजार 986 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. नवीन वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या माहितीवर विश्वास ठेऊ नये तसेच नवीन वीजजोडणीच्या प्रक्रियेत स्वयंघोषित एजंटांनाही थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी सिंगल फेजचे 25 हजार आणि 10-40 अ‍ॅम्पीअर थ्री फेजचे 5014 नवीन वीजमीटर नुकतेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासह आता या सर्व जिल्ह्यांमध्ये सिंगल फेजचे 91 हजार 449 आणि थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअरचे 23 हजार 537 नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यात (कंसात – थ्री फेज 10-40 अ‍ॅम्पीअर) सिंगल फेजचे 51,291 (8977), सातारा जिल्ह्यात सिंगल फेजचे 8242 (3611), सोलापूर जिल्ह्यात 10636 (4704), कोल्हापूर जिल्ह्यात 6499 (3880) आणि सांगली जिल्ह्यात 14,781 (2365) नवीन वीजमीटर उपलब्ध आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या नवीन वीजमीटरची संख्या ही सद्यस्थितीत नवीन वीजजोडणी तसेच सदोष किंवा नादुरुस्त वीजमीटर बदलण्याच्या तुलनेत अधिक आहे. पेडपेडींगमधील नवीन वीजजोडणी ताबडतोब देण्याचे तसेच नादुरुस्त वीजमीटर सुद्धा तातडीने बदलण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. नवीन मीटर लावल्यानंतर त्याची महावितरण अंतर्गत ईआरपीमध्येही (एंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) तात्काळ नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वीजमीटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वीजग्राहकांची दिशाभूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 स्वयंघोषित एजंटांना थारा देऊ नका! – महावितरणच्या ग्राहकसेवेच्या सर्व सुविधा सुटसुटीत व पारदर्शक असतानाही स्वयंघोषित एजंट म्हणून आर्थिक फटका देणार्‍या व्यक्तींना वीजग्राहकांनी थारा देऊ नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार मंजुरी, नावात बदल आदींबाबतची प्रक्रिया सुटसुटीत व पारदर्शक करण्यात आली आहे. महावितरणची वेबसाईट किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. वेबसाईटवर नवीन वीजजोडणीचा एक पानी अर्ज उपलब्ध आहे व लागणारी आवश्यक कागदपत्रे व महत्वाचे म्हणजे वीजजोडणीसाठी लागणार्‍या शुल्काची माहिती उपलब्ध आहे. ऑनलॉईन किंवा अर्ज भरून दाखल केलेल्या नवीन वीजजोडणीची महावितरण अंतर्गत प्रक्रिया ही पूर्णतः ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर त्याची स्थिती ही ग्राहकांना स्वतः वेबसाईटवर पाहता येते किंवा महावितरण कार्यालयातून त्याबाबत माहिती घेता येते.

वीजग्राहकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास, तक्रार असल्यास त्यांनी थेट संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना अथवा कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणून द्यावी. महावितरणकडून वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’सह कार्यालयीन ग्राहकसेवा अतिशय सुलभपणे राबविण्यात येत आहेत. त्यामुळे वीजग्राहकांना कोणत्याही स्वयंघोषित एजंटांकडे जाण्याची आवश्यकता नाही. हे स्वयंघोषित एजंट स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजग्राहकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करतात. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा स्वयंघोषित एजंटांना थारा न देता महावितरणच्या सेवांचा थेट लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रंगणार संशोधकांचा मेळा

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या हार्डवेअर अंतिम फेरीसाठीदेशभरातील २४ संघांचा सहभाग पुणे: एमआयटी...

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या...

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव आयसीयूमध्ये:शरद पवारांनी घेतली प्रकृतीची माहिती

पुणे-ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे...