Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उत्कृष्ट ग्राहकसेवा व कंपनीहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संकल्प

Date:

महावितरणमध्ये संवाद कार्यक्रमाद्वारे नववर्षाचे स्वागत

पुणे : महावितरणच्या अस्तित्वाचा केंद्गबिंदू असलेल्या वीजग्राहकांना आणखी उत्कृष्ट व वेगवान सेवा देण्यासोबतच महावितरणसाठी आव्हान ठरणार्‍या प्रत्येक परिस्थितीवर एकजुटीने मात करण्याचा निर्धार व संकल्प महावितरणमध्ये सोमवारी (दि. 1) करण्यात आला.

नववर्षाच्या स्वागतासाठी सेनापती बापट मार्गावरील महावितरणच्या प्रकाशभवनात येथे प्रशासन, कर्मचारी संघटना व कर्मचारी यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता श्री. रमेश मलामे, श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. राजेंद्ग पवार, श्री. विजय भाटकर, श्री. वादिराज जहागिरदार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण उपस्थित होते.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की वीजक्षेत्र सातत्याने बदलणारे असल्याने पूर्वीच्या चांगल्या कामगिरीवर आपल्याला अवलंबून राहणे शक्य नाही. नवीन वर्षात महावितरणसमोरील आव्हानांना सामोरे जाताना दैनंदिन नियोजनातून काम करणे व त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. वैयक्तिक आयुष्यातील वाचन, व्यायाम, खेळ आदींचेही संकल्प सिद्धीस नेल्यास त्याचा चांगला परिणाम प्रशासकीय कामावर होतो. वीजबिलांचा थकबाकी वसुल करणे ही आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. शून्य थकबाकी मोहिमेद्वारे ही जबाबदारी यंदा पूर्ण करण्यासोबतच महावितरणच्या सेवांबाबत ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहावे असे आवाहन प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी केले.

मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे म्हणाले, की वीजक्षेत्रात वाढलेल्या स्पर्धेच्या युगात आपण कार्यरत आहे. सातत्याने होणारे बदल स्वीकारताना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीची आर्थिक बाजू भक्कम असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक युनिटचा हिशेब व त्या प्रत्येक युनिटची वसुली महत्वाची आहे.

महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी प्रकाशभवनमध्ये सुरु करण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या सदस्यत्व नोंदणीला नववर्षानिमित्त या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला. सध्या ग्रंथालयात असलेल्या 700 पुस्तकांची संख्या यावर्षी 5000 पर्यंत नेण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सर्वश्री तुकाराम डिंबळे, भीमाशंकर पोहेकर, श्रीरंग घुले, शिवाजी शिवनेचारी, गणेश दांगट, किशोर अहिवळे, रफीक शेख, सौ. सारिका सातपुते यांनीही मनोगत व्यक्त केले. अधीक्षक अभियंता श्री. उत्क्रांत धायगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अधीक्षक अभियंता श्री. गौतम गायकवाड व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. संतोष पटनी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अभियंते, अधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास...