मुंबई– दिल्ली येथे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विद्यमाने आयोजित 11 व्या इंडियन एनर्जी समिटमध्ये महावितरणचा बेस्ट पॉवर युटिलीटीमध्ये द्वितीय क्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात महावितरणला प्रथम क्रमांकाचा मोस्ट इनोव्हिटीव्ह डिसकॉम ऍ़वार्ड तसेच ग्रिन ग्रिडमध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विद्यमाने इंडियन एनर्जी समिट 2017 या कार्यक्रमाचे आयोजन 28 व 29 नोव्हेबर 2017 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात महावितरणने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल बेस्ट पॉवर युटिलिटीच्या द्वितीय क्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरविण्यात आले.
ग्राहकसेवेंतर्गत अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला प्रथम क्रमांकाचा मोस्ट इनोव्हिटीव्ह डिसकॉम ऍ़वार्ड तसेच अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रिन ग्रिडमध्येही द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

