पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने देहूरोड-निगडी दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणावेळी डथळा ठरणारे २६१ वृक्ष तोडीस हरकत नोंदवून ही महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून कोणतीच दखल न घेतल्याने हरीत लवादात अखेर दावा दाखल केला. दि. १७/३/२०१७ रोजी हरीत लवाद न्यायालयापुढे सुनावणी होवून न्यायालयाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ पुणे, वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा गोखलेनगर पुणे, वनक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ , वाडीया टेक्नो इंजि. सव्ह. प्रा.लिमि., टि. अँन्ड टी. इंफ्रा.प्रा.लि. मार्केटयार्ड पुणे व राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळ नागपुर यांना कोर्टाने नोटीस देवून दि. २३/३/२०१७ रोजी सुनावणीस हजर रहाण्याचे सांगितले आहे. हरीत लवाद न्यायायलात संस्थेच्या वतीने संस्थेचे सल्लागार अँड. रुपालीवाईकर , अँड. भक्ती गोधमगावकर, अँड. के. एच. मुजावर यांनी बाजु मांढली असी माहीती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर , पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोंगदड , डॉ. शलाक आगरवाल यांनी दिली.
२६१ वृक्ष तोडीस हरकत .. रस्ते विकास महामंडळाला कोर्टाची नोटीस
Date: