पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष, खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पुणे शहर सेवादलचे अध्यक्ष योगेश जगताप यांच्या हस्ते खा.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
यावेळी कलेश्वर घुले, अशोक राठी, हेमंत येवलेकर, शंकर शिंदे, दिनेश घुले, योगेश वराडे, संजय गाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप
‘चंद्रकांत दरोडे प्राथमिक शाळा’ (बीएमसीसी रस्ता) मध्ये खा.वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी रवि चौधरी, अॅड. औदुंबर खुने- पाटील, शैलेश बडदे, दिलीप शहा, अमित कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अत्रे आदी उपस्थित होते.
—————————— ——

