मातंग समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करु
खासदार संजय काकडे यांचे आश्वासन
पुणे, दि. 1 ऑगस्ट : मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी आज अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले. तसेच, शाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आयोजित अभिवादन सभेत खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक व युक्रांदचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,नगरसेवक अविनाश बागवे,सुनील कांबळे, हनुमंत साठे, तुषार पाटील, भगवान वैराट, महेश सकट आदी मान्यवर उपस्थित होते.

