Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खासदार काकडेंनी घेतली अर्थमंत्री जेटलींची भेट

Date:

कॅन्टोन्मेंटच्या आर्थिक प्रश्नांसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री जेटली राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याशी बोलणार

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक प्रश्न व विकासासंदर्भात राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. कॅन्टोन्मेंट परिसरातील विकासकामांसाठी निधी देण्यासंदर्भात आपण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी लवकरात लवकर बोलून हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी यावेळी दिल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समस्या व प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात खासदार संजय काकडे यांची नुकतीच नगरसेवकांसोबत बैठक झाली होती. त्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन अर्थमंत्री जेटली यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. यावेळी पुणे कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, दिलीप गिरमकर, रुपाली बिडकर, किरण मंत्री, विवेक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान खासदार संजय काकडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासमोरील एलबीटी रद्द होऊन जीएसटी सुरु झाल्यानंतर निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, प्रलंबित विकासकामे तसेच महापालिकेप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही राज्य व केंद्राकडून विविध विकास योजनांसाठी निधी मिळण्यासंदर्भात आग्रही भूमिका मांडली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत अर्थमंत्री जेटली यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अर्थमंत्री जेटली यांनी खासदार संजय काकडे व शिष्टमंडळाला दिले.

जीएसटी सुरु होण्यापूर्वी एलबीटीच्या माध्यमातून सुमारे 150 कोटी रुपये मिळायचे. जीएसटी सुरु झाल्यापासून एलबीटीचे 150 कोटी रुपये बंद झाले. आता कॅन्टोन्मेंट बोर्डाला विकास कर व इतर सर्व कर मिळून 97 कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापोटी मिळतात. तर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा वार्षिक खर्च 131 कोटी रुपये होत आहे. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला 34 कोटींचा तोटा होत आहे. एलबीटीपोटी मिळणारी रक्कम बंद झाल्याने कॅटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट झाली. दोन वर्षांत विकास कामांसाठी बोर्डाच्या 100 कोटीच्या मुदत ठेवीतील सुमारे 70 कोटी रुपये खर्च झाले असून सुमारे 30 कोटी रुपयेच शिल्लक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी व येथील मुलभूत सुविधांच्या विकासासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दरवर्षी केंद्राकडून 100 कोटी रुपये मिळायला हवेत. अर्थमंत्री जेटली यांच्यासोबत झालेल्या आजच्या बैठकीत ही सर्व परिस्थिती खासदार काकडे यांनी अर्थमंत्री जेटली यांच्या निदर्शनास आणून दिली.

नेता असावा तर, असा…
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. हे प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालले होते. याचे गांभिर्य लक्षात घेऊन खासदार संजय काकडे यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी तत्काळ भेट घडवून आणली. पुणे शहराला अशाच आत्मियतेने प्रश्न समजून घेणाऱ्या व त्या प्रश्नांची तत्काळ उकल करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी खासदार काकडेंप्रती याविषयी आभार व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...