पुणे-SC/ST आयोगाला ज्या प्रमाणे घटनात्मक दर्जा आहे त्याच प्रमाणे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे “Constitution (123rd Amendment) Bill 2017″ हे विधेयक लोकसभेत त्वरेने मंजूर करण्यात आले. दुर्दैवाने कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी विरोधी भूमिकेमुळे राज्यसभेत अजूनही हे विधेयक पास झाले नसून कॉंग्रेस नेहमीच ओबीसी समाजाविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप खासदार अनिल शिरोळे ह्यांनी केला. महात्मा फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. कॉंग्रेस च्या ह्या आडमुठे पणामुळे ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्वाचे असणारे हे विधेयक हेतुपूर्वक राज्यसभेत मंजूर झाले नसून कॉंग्रेस पक्षाने त्यांची हि आडमुठी भूमिका सोडून ओबीसी समाजाच्या विकासासाठी हे विधेयक पास करण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन देखील शिरोळे ह्यांनी केले आहे.
कॉंग्रेस ने ओबीसी कमिशन बिल रोखले – खा. अनिल शिरोळे
Date:

