पुणे-‘‘झाशीची राणी चौक जंगली महाराज रस्ता येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने मनोहर भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, निता राजपूत, नंदा ढावरे, राजश्री अडसूळ, रमा भोसले मोनिका गावडे, अश्विनी गव्हाणे,कांता ढोणे , आयेशा शेख आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संगीता तिवारी म्हणाल्या ,’ काल विधानभवनामध्ये एक पत्रकार महिला मनोहर भिडे यांच्याशी बोलायला गेल्या असता ‘पोरी पहिल कुंकू लाव आणि नंतर माझ्याशी बोल’ असे बोलून तिला हुसकवून लावले.आज आपला महाराष्ट्र शाहू – फुले – आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा आहे. माँ जिजाऊ, ताराराणी, अहिल्यादेवी, इंदिरा गांधी यांनी कुंकू न लावता आपले सामर्थ्य या देशाला दाखवून दिले आणि सिध्द ही केले. अतंराळवीर कल्पना चावला हिने ही कुंकू न लावता आपल सामर्थ्य सिध्द केले होते. नेव्ही, डिफेन्स, मिलिटरी,पोलिस फोर्स येथे ही कित्येक महिलांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे हो. असे असताना हा बुरसटलेल्या विचारसरणी चा माणूस काहीही बोलतो,खरे तर आम्ही महिलांनी कुंकू लावावे का नाही हा आमचा निर्णय ,आमचा हक्क आहे. देशामध्ये लोकशाहीनुसार प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यानुसार आपण स्वत: आपले निर्णय घेवू शकतो. मनोहर भिडेंनी आम्हाला संस्कारांचे शिक्षण देऊ नये. इंटर्नल पोलिस डायरी मध्ये ह्याचा उल्लेख धर्मवेडा माथेफिरू असा आहे.असेही तिवारी म्हणाल्या .