महाराष्ट्राला 3 लाख कोटींपेक्षा जास्त दिले, तरीही राज्यात केंद्राबाबत गैरसमज पसरवण्यात आले- देवेंद्र फडणवीसांचा दावा

Date:

मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार 611 कोटी रुपये दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पाबाबत काही जणांनी गैरसमज पसरवले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला वर्षाला मिळाले. हा मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे. असेही फडणवीस म्हणाले.

भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींनाही अभिव्यक्ती स्वातंत्र मिळत नाही. या सेलिब्रिटिंनी देशाच्या हितासाठी ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचे मानसित संतुलन तपासले पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

घरोघरी पाणी मिळावे यासाठी 1 हजार 133 कोटी रुपये दिले.

मुंबई मेट्रो तीन म्हणजे आरे कारशेडवाली यालाही1832 कोटी रूपये

नागपूर मेट्रोसाठी 5976 कोटी रुपये

नाशिक मेट्रोसाठी 2092 कोटी मंजूर झाले

शेतकरी सन्मान योजनेसाठी 6 हजार 823 कोटी रुपयांचा निधी

हवामान आधारित शेती प्रकल्पांसाठी

खांडवा-अकोला मार्गाला परवानगी

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद

राज्याच्या रेल्वेच्या 16 नवीन लाइन्स मिळाल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...