चित्रकलेचा माणसाच्या सौंदर्यदृष्टी आणि लोकशाहीशी संबंध- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रवि परांजपे

Date:

राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १४३  शाळांतील १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : चित्रकला ही प्रत्येकाच्या जीवनात असणे गरजेचे आहे. चित्रकलेचा संबंध माणसाच्या सौंदर्यदृष्टीशी असतो. सौंदर्यदृष्टी नसेल, तर लोकशाही प्रक्रिया अपूर्ण आहे, हे सिद्ध झाले आहे. राज्याला आणि देशाला चांगली सौंदर्यदृष्टी असणा-यांची आवश्यकता आहे. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातील या चित्रकला स्पर्धेला राष्ट्रीय स्तराचे महत्त्व असून याद्वारे चित्रकला व सौंदर्यदृष्टीतून लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार रवि परांजपे यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, सचिन तावरे, प्रेमलता आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, गौरव आबनावे, प्रज्योत आबनावे, योगेश आबनावे, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, भोला वांजळे, कल्याणी साळुंखे, रुपाली राऊत, भागोजी शिखरे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा १५ वे वर्ष आहे.


मोहन जोशी म्हणाले, चित्रकला हे मनातील भावना कॅनव्हासवर उमटविण्याचे उत्तम साधन आहे. यामुळेच आपल्याला आत्मिक आनंद मिळतो. आपल्या स्वप्नातील चित्र कॅनव्हासवर रंगविण्यात प्रत्येकालाच विलक्षण आनंद वाटतो. आजची पिढी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे. जगामध्ये प्रगत देश म्हणून भारताला ओळख मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य देखील गरजेचे आहे. त्यामुळे असे उपक्रम सप्ताहात राबविण्यात येत आहेत. राज्यभरातून १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याकरीता एकत्र येणे हा आगळावेगळा उपक्रम आहे. सामाजिक विषय मुलांना देऊन चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचे संस्कार घडविण्याचे काम कलेच्या माध्यमातून केले जात आहे, असेही ते म्हणाले.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, पाणी वाचवा पाणी जिरवा, स्वच्छता अभियान यांसारख्या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्य पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १४३ शाळांतील सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली. सामान्य मुलांसोबत दृष्टीहिन मुलींनी आणि पालक व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. यावेळी चित्रकार मुरली लाहोटी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...