Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

देशाची वाटचाल अध्यक्षीय हुकूमशाहीकडे – उद्धव ठाकरे

Date:

ठाकरेंचे नाव वापरून माडीवर गेलात आणि …..

छत्रपती संभाजीनगर – देशाची वाटचाल मोदींच्या काळात अध्यक्षीय हुकुमशाहीच्या मार्गाने होत असल्याचा आरोप आज येथे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केला. आणि याच वेळी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले ठाकरेंचे नाव वापरून माडीवर गेलात आणि आता तेथूनच ठाकरेंना संपविण्यासाठी खेचू पाहता ?हिंमत असेल तर महाराष्ट्रात निवडणुका घ्या आणि त्या मोदींच्या नावावर लढा मी लढतो केवळ माझ्या वडिलांच्या नावावर .. माझ्या वडिलांचे नाव मी सोडणार नाही ..तुम्ही तुमच्या वडिलांना वाईट वाटू देऊ नका .

ठाकरे म्हणाले,’ पंतप्रधानांची पदवी विचारली तर 25 हजारांचा दंड लावला जातो. पंतप्रधानांकडे अशी कोणती पदवी आहे. पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये. पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेतला की काय? असा जोरदार हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला. यासह हल्ली डाॅक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचे इंजेक्शन घेवून फिरतात असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

हिंदू पंतप्रधान असताना आक्रोशाची वेळ

”जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा निवडणुका उंबरठ्यावर आले असे समजा. सावरकर गौरव यात्रा काढा अजून काढा. जनआक्रोश मोर्चेही काढले जात आहेत. तो मुंबईत निघाला व शिवसेनाभवनपर्यंत आणला. जगातील सर्वात शक्तिमान हिंदु नेता पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना जनआक्रोश करायची वेळ आली असेल तर त्या नेत्याची शक्ति काय कामाची?” असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेत पंतप्रधान मोदींवर केला.उद्धव ठाकरे म्हणाले, जे भाजपला जमले नाही ते मविआने करून दाखवले. करायचे काही नाही नुसते कोंबडे झुंजवत बसायचे हे भाजपचे काम आहे. जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा निवडणुका उंबरठ्यावर आले असे समजा.

पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये?

उद्धव ठाकरे म्हणाले, मी काॅंग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले मग भाजप महेबुबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहमंद यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी घालून बसला मग त्यांनी काय सोडले होते. हिंदुत्वाचे मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि देशद्रोही ही जर तुमची मस्ती असेल तर ती आम्ही गाडण्यासाठीच वज्रमुठ आवळली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कर्ज काढून अनेकांनी शिक्षण घेतले. पण हल्ली असे म्हणतात डाॅक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचे इंजेक्शन घेवून फिरतात. अनेक जण असे आहेत की, पदव्या दाखवूनही किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर पंचवीस हजारांचा दंड लावला जातो. पंतप्रधानांकडे अशी कोणती पदवी आहे. पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये. पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेतला की काय?

उद्धव ठाकरे म्हणाले, मविआचे सरकार तुम्हाला पसंत होते की, नाही. महाविकास आघाडीचे सरकार ज्या पद्धतीने पाडले ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का? शिवरायांचे, संभाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि सरकार पाडण्यासाठी पाठीत मागून खंजीर खुपसायचा. शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्तेसाठी एकत्र आलो, पण सत्ता गेल्यानंतरही आम्ही घट्टपण एकत्रच आहोत.

मिंध्यांचे तुम्ही काय चाटता?

उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शहांनी माझ्यावर आरोप केले. सत्तेसाठी तळवे चाटल्याची भाषा केली. मलाही शिवसेनाप्रमुखांची भाषा मला येते पण ती त्यांनाच शोभत आहे. आम्ही तळवे चाटत होतो तर तु्म्ही मिंध्यांचे काय चाटताय?उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब काम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मग आम्ही म्हणतो आम्हालाही प्रतिमा नाही का? आम्ही काही म्हटले तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना बोलले तर ओबीसींचा अपमान! विरोधकांना त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकश्या लावल्या जात आहेत. चारीत्र्यहनन केले जातेय, तुरुंगात टाकले जातेय. भ्रष्ट म्हणून हिनवले जात आहे.उद्धव ठाकरे म्हणाले्, ज्या संगमासोबत तुम्ही सरकार स्थापन केले त्याच संगमावर तुम्ही भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते मग मी म्हणतो की, अमित शहाजी तुम्ही संगमाचे काय चाटत आहात? दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात अशी भाजपची निती त्या पक्षात भ्रष्ट्राचाराने बरबटलेले लोक आहेत. या पक्षाचे नाव भ्रष्ट्राचार पक्ष नाव ठेवा. भाजपच्या व्यासपीठावर आधी साधू दिसायचे. आता संधीसाधू आहेत. तो जमाना वेगळा होता तो जमाना अटलजी, शिवसेनाप्रमुखांचा होता.

पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवा

उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही संपवायची. दुसरा पक्ष संपवण्यासाठी लोकांना तुरुंगात टाकायचे काम भाजप करीत आहे. सावरकरांची गौरव यात्रा काढा पण त्यांचे स्वप्न सिंधूपासून हिंदी महासागरापर्यंत भारत हे स्पप्न पुर्ण करून दाखवा. जमीन दाखवायची असे तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा अन्यथा गप्पा मारू नका. सरदार वल्लभभाई पटेलांचे गुजरातेत सर्वात मोठे स्मारक आहे. ते होते म्हणूनच मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले मग त्यांच्यासारखी हिम्मद पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवा.उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप देशात घातक प्रकार करू इच्छीते. न्यायव्यवस्था ती आपल्या अधिकारात आणू इच्छीते. ती त्यांची वाटचालही आहे. ज्या दिवशी न्यायव्यवस्थेवर भाजपचा प्रभाव असेल त्या दिवशी लोकशाही संपली म्हणून समजा. इस्त्रायली जनता पेटून उठली तेव्हा तेथील पंतप्रधानही झुकले होते. बे..बे.. करणारी लोकशाही नको. पंतप्रधानांवरही वचक जनतेचा हवा.उद्धव ठाकरे म्हणाले, घटना पायदळी तुडवणाऱ्यांना पायदळी तुडवू. मराठवाड्यात शेतकरी, कामगारांची अवहेलना सुरू आहे. कामगारांसाठी केंद्राने मालकधार्जीणा कायदा आणला. तो आम्ही महाराष्ट्रात लागू करू दिला नाही पण मिंधे सरकार तो कायदा महाराष्ट्रात आणू पाहत आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या, जवानांच्या कष्टावर देश उभा आहे. देशाला दिशा देण्याचे राजकारण्यांचे काम पण या वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. या सरकारवर जनता खूश नाही.उद्धव ठाकरे म्हणाले,​ आम्ही फसवा – फसवीचे धंदे केले नाही कधी करणार नाही. पिककर्ज माफ केले त्याचा शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात लाभ झाला आता तो मिळत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढतोय माझ्यावर तेव्हा टीका झाली. जे काम कोरोनाकाळात मी घरून केले ते सत्ताधाऱ्यांनी गुवाहाटी, सुरतला जावून केले नाही.उद्धव ठाकरे म्हणाले,​ तोतयेगिरीचे सरकार सुरू आहे. आम्ही भाजपला खांद्यावर घेवून फिरवले. महाराष्ट्र त्यांना स्वीकारत नव्हता. शिवसेनाप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी रक्त सांडले ते देशासाठी पण तेच आज आपल्याला लाथ देत आहेत. ”मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नाव, चिन्ह चोरले. माझे वडीलही चोरले. मुख्यमंत्र्यांच्या वडीलांना काय वाटत असेल..दिवटं कारटं बापही दुसऱ्यांचे लागते.” ​​​​​​​मी माझ्या वडीलांचे नाव सोडणार नाही. माझ्या वडीलांच्या नावाचा तुम्ही वापर करून घेतला.

वाचू का? म्हणणारे निवडणुकीत वाचणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, मी आज सांगतो की, मी माझ्या वडीलांचे नाव घेतो तुम्ही मोदींना महाराष्ट्रात आणा आणि महाराष्ट्रात निवडणुका जिंकून दाखवा. उद्धव ठाकरेंना एकटा पाडायचे कारस्थान तुम्ही केले. पण काॅंग्रेस, राष्ट्रवादीने साथ दिली. तुम्ही काय चोरणार, माझे काय घेणार माझ्या आईवडीलांचे आशीर्वाद आणि आई जगदंबेचे आशीर्वाद चोरू शकत नाही. तुम्ही (एकनाथ शिंदे) सभेत खुर्च्या भाड्याने आणू शकता. भाड्याने आणलेले लोक शेवटपर्यंत तुमच्या सभेत बसत नाही. त्यांना विचार दुसऱ्यांचे लागतात, सभेत वाचू का..वाचू का..म्हणता..जनता जेव्हा मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...