ना मोदीजी,ना देवेंद्रजी,ना चंद्रकांतदादांचे फोटो..थेट मुळीकांचा फोटो ‘भावी खासदार’ म्हणून झळकला

Date:

पुणे-काळ कोणासाठी थांबत नसतो ,आणि पुढे पुढे चालावेच लागते..एक जागा रिक्त होत असताना त्यानंतर कोण याबाबत जागा रिक्त होण्या अगोदरपासूनच सुप्त हालचाली सुरु झालेल्या असतात.ही जगाची रीत आहे.पण तरीही काही संकेत,प्रथा आणि भावनांना अल्पशी शांतता म्हणून अवधी दिला जातो हे खरे असले तरी भाजपमध्ये काही वेगळेच घडत असल्याचे जाणवत आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे कोणीही आपल्या वाढदिवसाच्या जाहिराती करू नयेत अशी आव्हाने भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली असतानाही त्यांच्या वाढदिवशी शुभेछ्या देणारे होर्डींग्ज आणि वृत्तपत्रातून जाहिराती झळकल्या आता हि जादू कशी झाली त्यांनाच ठाऊक पण हि जादू इथवर पोहोचली कि होर्डींग्ज आणि जाहिरातींमध्ये ना पंतप्रधान मोदींचा फोटो होता ना अमितभाई शहांचा होता ना देवेन्द्रजी फडणविसांचा होता, ना अनिल शिरोळे,ना संजय काकडे यांचा फोटो होता.बास फक्त जगदीश मुळीक झळकत होते आणि शुभेछ्या देणारे त्यांचे कार्यकर्ते..भाजयुमो आणि भाजपचे कार्यकर्ते यांचे फोटो होते.शिवाय आश्चर्याची बाब म्हणजे या होर्डींग्ज वर भावी खासदार असा ठळक उल्लेख मुळीक यांचा केला गेल्याने चर्चा तर सुरु झाली.बापट साहेब गेलेत आता निश्चित दुसरा कोणी खासदारकीची माळ गळ्यात घेण्यासाठी पुढे येणार यात गैर नाही.पण अशा पद्धतीने जगदीश मुळीक खासदारकीसाठी पुढे येतील अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.खासदारकीसाठी २ वर्षे अगोदरच देव पाण्यात ठेऊन बसलेले भाजपमधील २ नेते काय करतील बिच्चारे अशी अवस्था जणू असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान या होर्डींग्ज आणि जाहिरात बाजीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने लक्ष केले आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले आहे कि,’ १० दिवसांचे सुतक तर संपुद्या मग लावा बैनर का तुम्ही वाटच बघत होतात..आणि म्हणता आम्ही इतर पक्षापेक्षा वेगळे आहोत..हाच का तुमचा वेगळे पणा. बापट साहेबांच्या घरच्यांचे अश्रू अजुन वाहात आहेत.तोवरच तुम्ही बैट पॅड घालून तयार

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...