Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियातर्फे OBD2 चे पालन करणारी 2023 एसपी125 लाँच

Date:

नवी दिल्ली, ३१ मार्च २०२३ – ग्राहकांच्या आनंदासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज OBD2 चे पालन करणारी 2023 एसपी125 लाँच केली आहे.

2023 एसपी 125 लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘OBD2 चे पालन करणाऱ्या 2023 एसपी125 चे लाँच करताना आम्हाला अभिमान वाटत आहे, कारण ही मोटरसायकल केवळ स्पोर्टी व स्टायलिशच नाही, तर कार्यक्षम आणि पैशांचे पूर्ण मूल्य देणारी आहे. एसपी125 हे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे प्रतीक आहे आणि आम्हाला खात्री वाटते, की ही गाडी मोटरसायकल प्रेमींच्य रायडिंग अनुभवाविषयी असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल.’

2023 एसपी125 च्या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे ऑपरेटिंग अधिकारी श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘ग्राहकांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यता देण्यासाठी होंडाने जपलेल्या बांधिलकीच्या प्रवासात आजचा दिवस विशेष करून नोंदला जाईल. एचएमएसआयमध्ये आम्ही कायमच ग्राहकांच्या अपेक्षा पार करण्यासाठी झटत असतो आणि नवी, OBD2 चे पालन करणारी एसपी125 त्याला अपवाद नाही. आम्हाला खात्री आहे, की नवी एसपी125 ग्राहकांमध्ये वेगाने लोकप्रिय ठरेल आणि कामगिरी, आरामदायीपणा व टिकाऊपणा यांचे नवे मापदंड तयार करेल.’

नवी एसपी125 येऊ घातलेल्या स्थित्यंतराच्या काळासाठी खास तयार करण्यात आली आहे. आपल्या वैशिष्ट्यांनी ती तुम्हाला इतरांपुढे राहाण्यास मदत करेल तसेच पैशांचे पूर्ण मूल्य मिळवून देईल.

2023 एसपी125 मध्ये BSVI OBD2 चे पालन करणारे होंडाचे विश्वासार्ह १२५ सीसी पीजीएस- एफआय इंजिन बसवण्यात आले असून त्याला एनहान्स्ड स्मार्ट पॉवरची (ईएसपी) जोड देण्यात आली आहे.

नव्या एसपी125 मध्ये सध्या अस्तित्वात असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान समाविष्ट करत भारताला जागतिक मापदंडाची बरोबरी करणे शक्य केले आहे – अभिजात, अचूक आणि संवेदनशील एनहान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी).

इंजिनाच्या कामगिरीला चालना देणारे एनहान्स्ड स्मार्ट पॉवर (ईएसपी) तंत्रज्ञान घर्षण कमी करून इंजिनची कामगिरी उंचावते, आवाजविरहीत स्टार्ट देऊन प्रवास पर्यावरणपूरक करते.

एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील बाबींचा समावेश आहे –

अनोखे होंडा एसीजी स्टार्टर – यामुळे इंजिन झटक्याशिवाय सुरू होते व त्याच एसी जनरेटरच्या मदतीने रायडिंग करताना करंटनिर्मिती आणि बॅटरी चार्जिंग केले जाते. यामुळे पारंपरिक प्रकारची स्टार्टर मोटर वापरण्याची गरज राहात नाही व पर्यायाने गियर मेशिंगचा आवाज येत नाही

दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे कमी प्रयत्नांत इंजिन सुरू होते – यातले पहिले म्हणजे डीकंप्रेशनचा कार्यक्षम वापर आणि किंचित उघडलेले एक्झॉस्ट व्हॉल्व्हज (कंप्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला दिलेले) आणि त्यानंतर स्विंग बॅक सुविधा, ज्यामुळे इंजिन जरासे विरूद्ध दिशेला फिरते व त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ मिळतो. पर्यायाने कमीत कमी उर्जेच्या वापराने इंजिन सुरू होते.

प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय): यंत्रणेमध्ये ७ ऑनबोर्ड सेन्सर्स आणि सातत्याने आवश्यक तितके इंधन व हवेचे मिश्रण वापरले जाते. यामुळे एकसलग उर्जा, इंधनाची उच्च कार्यक्षमता व कमी उत्सर्जन शक्य होते.

कमी घर्षण: पिस्टन कूलिंग जेटमुळे घर्षण कमी होते व इंजिनचे तापमान योग्य पातळीवर राखले जाते. ऑफसेट सिलेंडर रॉकर रोलर आर्मचा नीडलसह वापर करते व त्यामुळे घर्षणातून होणारे नुकसान आणखी कमी होते. र्यायाने उर्जेचे सलग व चांगले आउटपुट मिळते, शिवाय इंधन कार्यक्षमता उंचावते.

पूर्णपणे डिजिटल मीटर : नव्या एसपी125 मध्ये पूर्णपणे डिजिटल मीटर देण्यात आले आहे, जे रायडरला प्रवासात आवश्यक ती सर्व माहिती देते. या मीटरमध्ये इंधन कार्यक्षमतेचे तपशील, इको इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यु इंडिकेटर आणि इतर माहिती दर्शवली जाते.

इंधन कार्यक्षमतेचे तपशील – यामध्ये तीन प्रकारची रियल टाइम माहिती मिळते उदा. डिस्टन्स टु एम्प्टी, अव्हरेज फ्युएल एफिशियन्सी (प्रवासासाठीची इंधन कार्यक्षमता) आणि रियल टाइम फ्युएल एफिशियन्सी, ज्यामुळे रायडिंगचा आधुनिक अनुभव घेता येतो.

इको इंडिकेटर – स्विच करण्यायोग्य इको इंडिकेटर रायडिंगच्या वाजवी स्थितीसाठी विविध निकषांचे मोजमाप करतो. इको लाइट चमकदार दिसत असल्यास रायडरला इंधनाच्या सर्वोत्तम कार्यक्षमतेची खात्री मिळते.

गियर पोझिशन इंडिकेटर – यामध्ये तत्क्षणी वापरात असलेला गियर दाखवला जातो आणि पर्यायाने रायडरला मोटरसायकलची सर्वोत्तम कामगिरी अनुभवता येते.

आकर्षक स्टाइल आणि टँक डिझाइन तसेच सुधारित ग्राफिक्स यामुळे एसपी125 इतरांचे लक्ष वेधून घेते. आधुनिक पद्धतीचे हेडलॅम्प डिझाइन आणि ५ स्पोक स्पिल्ट अलॉय व्हील्स 2023 एसपी125 चे खेळकर रूप खुलवतात. ब्रॉड ग्रॅब रेल आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने डिझाइन करण्यात आलेले टेल लॅम्प्स मोटरसायकलच्या दणकट व्यक्तीमत्त्वात भर घालतात. याचे क्रोम फिनिश मफलर प्रीमियम दिसतात.

नव्या एसपी125 मोटरसायकलमध्ये स्पोर्टी, विस्तृत १००मिमीचे रियर टायर देण्यात आले आहे, ज्यामुळे गाडी जास्त स्थिर राहाण्यास मदत होते, विशेषतः वेगवान राइड्स आणि वळणांदरम्यान रायडिंगचा आनंददायी व तितकाच सुरक्षित अनुभव घेता येतो.

एलईडी डीसी हेडलॅम्प – प्रकाशमान आणि सातत्यपूर्ण एलईडी डीसी हेडलॅम्पमुळे अवघड रस्त्यांवरचे रायडिंग तसेच रात्रीच्या वेळेस कमी वेगातले रायडिंग सोपे होते.

  1. इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच – दुहेरी काम करणारा स्विच खालच्या बाजूला दाबल्यास इंजिन सुरू होते, तर वरच्या बाजूला नेल्यास इंजिन बंद होते.

समावेशक हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच – यामुळे एकाच स्विचवर सिग्नल पास करत हाय बीम/लो बीम सहजपणे नियंत्रित करता येते

५ स्पीड ट्रान्समिशन: 2023 एसपी125 जास्त वेग असतानाही सफाईदारपणे प्रवास करण्याचा आनंद देते.

बाह्य बाजूला असलेली इंधनाची टाकी – इंधनाची टाकी बाहेरच्या बाजूला बसवलेली असल्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो व तिचा सहज वापर करता येतो.

५ स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन रस्त्याच्या स्थितीनुसार अडजस्ट करून प्रवास सुखकर करता येतो. यामध्ये सील चेनही देण्यात आली असून ती वारंवार अडजस्ट करण्याची गरज नसते तसेच देखभालीचा खर्चही कमी असतो. एसपी125 चा प्रत्येक प्रवास आरामदायी व्हावा म्हणून त्यात कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह देण्यात आले आहेत.

किंमत, प्रकार आणि रंग

2023 एसपी 125 दोन व्हेरीएंट्समध्ये (ड्रम आणि डिस्क) व पाच रंगांत (ब्लॅक, मॅट अक्सिस, ग्रे मेटॅलिक, इंपेरियल रेड मेटॅलिक, पर्ल सायरन ब्लू आणि नवा मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक). नव्या एसपी 125 ची किंमत ड्रम व्हेरीएंटसाठी रू. ८५,१३१ आणि डिस्क व्हेरीएंटसाठी रू. ८९,१३१ आहे (एक्स शोरूम दिल्ली).

कामगिरी आणि कार्यक्षमता यांचा मिलाफ – १२५ सीसी बीएसव्हीआय OBD2 पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन व त्याला ईएसपीची (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) जोड#AQuietRevolution: पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरमुळे प्रत्येकवेळस जलद, आवाजविरहीत, झटका न देता स्टार्टपूर्णपणे डिजिटल मीटर: पूर्ण डिजिटल मीटरमध्ये दैनंदिन जीवनासाठी आवश्यक रियल टाइम आधुनिक माहिती दर्शवली जाते.नवी आणि आधुनिक स्टायलिंग – उठावदार फ्युएल टँक, नवे ग्राफिक्स, आधुनिक हेडलॅम्प आणि बोल्ड रियरआराम आणि सोयीस्करपणा देणारे आधुनिक एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विचइंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच आणि ५ स्पीड ट्रान्समिशन यांसह इतर आकर्षक वैशिष्ट्येग्राहकांसाठी सर्वोत्तम मूल्य2023 एसपी125 दोन व्हेरीएंटमध्ये उपलब्ध – ड्रम आणि डिस्कआकर्षक किंमत रू. ८५,१३१ (एक्स शोरूम- दिल्ली)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...