Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

CBI ने मनीष सिसोदियांना न्यायालयात हजर केले:5 दिवसांची कोठडी मागितली; दिल्लीत AAP चे निदर्शन, पोलिस पक्षाच्या कार्यालयात घुसले

Date:

दिल्ली-सीबीआयने सोमवारी दुपारी 3.10 वाजता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर केले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात तपास यंत्रणेने विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांच्याकडे सिसोदिया यांची 5 दिवसांची कोठडी मागितली आहे.

सीबीआयने 8 तासांच्या चौकशीनंतर रविवारी सिसोदिया यांना अटक केली. सिसोदिया प्रश्नांची नीट उत्तरे देत नसल्याचे तपास संस्थेने म्हटले होते.सिसोदिया यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टी (आप) दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने करत आहे. नेते-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील भाजप कार्यालयाचा घेराव करू, असे आपने म्हटले आहे.

जुलै 2022 मध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली. सक्सेना यांनी सिसोदिया यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यानंतर ईडी आणि सीबीआयने सिसोदियाविरुद्ध तपास सुरू केला.

सीबीआयला सिसोदिया यांची उत्तरे समाधानकारक वाटली नाहीत म्हणून अटक, चौकशीतील 4 महत्त्वाचे मुद्दे
1.
 मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने अटकेनंतर सांगितले की, सिसोदिया यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नाहीत. मद्य धोरणातील अनियमितता आणि त्यातून वैयक्तिक फायदा करून घेतल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

2. सीबीआयने म्हटले की, सिसोदिया यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. आम्ही त्यांच्यासमोर पुरावेही सादर केले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केले नाही. सखोल चौकशीसाठी त्यांना कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

3. सीबीआयने सांगितले की, सिसोदिया यांची 8 तास चौकशी करण्यात आली. सिसोदिया यांना मद्य धोरण, दिनेश अरोरा यांच्याशी सिसोदिया यांचे कनेक्शन याविषयी चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी अनेक फोन कॉल्सही करण्यात आले आहेत. त्यांच्या तपशीलाच्या आधारे सिसोदिया यांना प्रश्न विचारण्यात आले.

4. दिनेश अरोरा हे दिल्लीचे व्यापारी आहेत. त्यांचे रेस्तरॉं आहे. याप्रकरणी ईडीनेही तपास केला आहे. त्यात दिनेश अरोरा हे सिसोदिया यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात आले आहे. एजन्सीने म्हटले आहे की निवडणूक निधीबाबत आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी अरोरा यांच्याशी बोलले होते. यानंतर अरोरा यांनी अनेक व्यावसायिकांकडून निधीसाठी सहकार्य मागितले आणि विधानसभा निवडणुकीसाठी सिसोदिया यांना 82 लाख रुपये दिले.

आज काय काय घडले

  • दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यांची सुरक्षा दलांशी चकमकही झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यां आणि महिला पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.
  • आम आदमी पार्टी देशभरात निदर्शने करत आहे. पंजाब, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • रविवारी दिल्लीत अटकेत असलेल्या 26 आप नेत्यांना सोमवारी सोडण्यात आले. पक्ष कार्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीबीआय कार्यालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

सीबीआयच्या सूत्रांचा हवाला देत रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की, गेल्या वर्षी 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क विभागाची चौकशी केली होती. तेथून एक डिजिटल उपकरण जप्त करण्यात आले. या डिव्हाइसमधून सीबीआयला मद्य पॉलिसीचे दस्तऐवज उत्पादन शुल्क विभागाच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या यंत्रणेकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली.यानंतर सीबीआयने उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला चौकशीसाठी बोलावले. या अधिकाऱ्याने सिसोदिया यांच्या कार्यालयातून यावर्षी 14 जानेवारी रोजी जप्त केलेल्या प्रणालीचा तपशील दिला. या प्रणालीतील बहुतांश फाईल्स डिलीट करण्यात आल्या होत्या, मात्र फॉरेन्सिक टीमच्या मदतीने सीबीआयने डेटा परत मिळवला. हे कागदपत्र बाहेरून बनवून व्हॉट्सअॅपवर मिळाल्याचे फॉरेन्सिक तपासणीत उघड झाले आहे.ही माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने 1996 च्या बॅचच्या नोकरशहाला तपासासाठी बोलावले. या नोकरशहाने सिसोदिया यांचे सचिव म्हणून काम केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने सीबीआयला सांगितले की, मार्च २०२१ मध्ये सिसोदिया यांनी त्यांना केजरीवाल यांच्या कार्यालयात बोलावले होते. तेथे मद्यविक्री धोरणाच्या मसुद्याचा मंत्र्यांचा अहवाल अधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी सत्येंद्र जैनही उपस्थित होते.अधिकाऱ्याने सांगितले की, या मसुदा अहवालातूनच 12% नफा मार्जिनचा नियम आला आहे. या नियमासाठी कोणत्याही चर्चेची किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही फाइल आढळली नाही. रविवारी सीबीआयने या मसुद्याच्या अहवालाबाबत सिसोदिया यांची चौकशी केली मात्र सिसोदिया यांनी माहिती देण्यास नकार दिला. या अधिकाऱ्याचे जबाब फेब्रुवारीच्या सुरुवातीला दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले होते.

1. उपमुख्यमंत्री म्हणाले- मुलांनी कठोर अभ्यास करावा
सीबीआय कार्यालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी म्हटले की, ‘जेव्हा मी टीव्ही चॅनलमध्ये होतो. चांगला पगार होता, अँकर होतो. आयुष्य छान चालले होते. सर्व काही सोडून केजरीवाल यांच्यासोबत आलो. झोपडपट्टीत काम करू लागलो. आज जेव्हा ते मला तुरुंगात पाठवत आहेत, तेव्हा माझी पत्नी घरी एकटी असेल. ती खूप आजारी आहे. मुलगा विद्यापीठात शिकतो.

ते पुढे म्हणाले, मला शाळेत शिकणारी मुले खूप आवडतात. शिक्षणमंत्री मनीष काका तुरुंगात गेले आणि आता सुट्टी आली, असे समजू नका. सुट्टी असणार नाही. अपेक्षेप्रमाणे मेहनत करत आहात. मन लावून उत्तीर्ण व्हा. मुलं गाफील राहिली हे कळाले तर मला वाईट वाटेल.

2. सिसोदिया म्हणाले- भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तुरुंगात जाणे ही छोटी बाब
चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया म्हणाले की, मी आज पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे, संपूर्ण तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले, तरी मला पर्वा नाही. मी भगतसिंग यांचे अनुयायी आहे, देशासाठी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. तर त्यापुढे खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...