प्रशासनाचा 5 टक्के करवाढीचा प्रस्ताव भाजपने फेटाळला.

Date:

  • पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली,नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून मिळकतकरात प्रस्तावित करण्यात आलेली ५ टक्के करवाढ आजच्या सर्वसाधारण सभेत ठामपणे फेटाळण्यात आली. सत्ताधारी भाजपने पुणेकरांच्या हिताला प्राधान्य देत मिळकतकर धारकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये,अशी स्पष्ट व ठोस भूमिका सभागृहात मांडली. परिणामी पुणेकरांवरील संभाव्य करवाढीचे संकट टळले आहे.

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,“पुणेकरांनी भाजपला मोठ्या विश्वासाने साथ दिली आहे.त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रशासनाने सुचविलेला करवाढीचा प्रस्ताव आम्ही फेटाळला असून १ टक्काही करवाढ होऊ दिलेली नाही.त्यामुळे सध्या कोणतीही करवाढ लागू होणार नाही.”

शहरातील विकासकामांना गती देताना नागरिकांवर कर वाढविण्याऐवजी महापालिकेच्या उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत मजबूत करण्यावर भर दिला जाईल, समाविष्ट गावांच्या करवाढीचा मुद्दा विशेष सभेद्वारे मार्गी लावण्यात येईल,अशी ग्वाहीही यावेळी बिडकर यांनी दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला!

पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील त्रिमूर्ती लॉन्स परिसरातील एका कंपनीला...

शेतकरी,बेरोजगार, महिला, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार: रमेश चेन्नीथला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, विपरित...

लोहगाव–वाघोली रस्त्यावरील कंपनीला भीषण आग;

पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला! पुणे : लोहगाव–वाघोली रस्त्यावरील...