पुणे- नव्या दमाची नवी तरुणाई राजकारणात दाखल होणार कि नाही ? या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर काही नवीन चेहरे गेल्या निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही दिसणार आहेत . यावेळी माजी उपमहापौर राहिलेले दीपक मानकर नाही तर त्यांचे पुत्र हर्षवर्धन मानकर निवडणुकीच्या रणांगणात दिसतील आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर येथील अधिकृत उमेदवार म्हणून हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे नामनिर्देशन पत्र सादर केले.प्रभाग क्रमांक ११ (अ) रामबाग कॉलनी–शिवतीर्थनगर प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याची आणि लोकहिताला प्राधान्य देण्याची भूमिका यानिमित्ताने त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नव्या तरुणाईच्या चेहऱ्यात:राष्ट्रवादीकडून हर्षवर्धन मानकरांचा उमेदवारी अर्ज दाखल
Date:

