पुणे: पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात संत तुकाराम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज यांचा ‘२०२५-२६’ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘भारतीय सांस्कृतिक वारसा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
या स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड हायवे सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक श्री.तानाजी चिखले, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. फुलचंद चाटे, सौ. वैशाली चाटे, प्राचार्य गौरव राऊत, सुवर्णा कुलकर्णी यांच्यासह शाळेचा सर्व शिक्षक कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
श्री.तानाजी चिखले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी कष्ट आणि शिस्ती महत्वाची असून विद्यार्थी दशेत लागलेली शिस्त ही आयुष्यभरासाठी फायदेशीर होत असते. स्पर्धेचे युग असून वेळेचे नियोजन महत्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराने जिंकली एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर करून भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले. यामध्ये प्रामुख्याने ‘आम्ही मावळे होणार’ या सादरीकरणातून शिवकालीन इतिहासाला उजाळा देण्यात आला.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे भरतनाट्यम नृत्य सादर करण्यात आले. यासोबतच विविध देशभक्तीपर गीते आणि नृत्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
पालकांचा उदंड प्रतिसाद
हा सोहळा पाहण्यासाठी अण्णाभाऊ साठे सभागृहात पालकांनी मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. “द रिअल वे टू द रॉयल सक्सेस” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला

