पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

Date:

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि इतिहासाचा अपमान करण्यात आला असा आरोप करत यास भाजप व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकीय हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे सांगत शिवसेनेने आज पेशवे पार्क येथे तीव्र निदर्शने केली.या आंदोलनात शहरप्रमुख श्री. संजय मोरे,गजानन थरकुडे, गटनेते अशोक हरणावळ, उपशहरप्रमुख भारत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत,दिलीप पोमन, मुकुंद चव्हाण, राजू चव्हाण, गोविंद निंबाळकर, गणेश घोलप, रणजीत शिंदे, संदीप गायकवाड, संजय साळवी, सुरज लोखंडे, रमेश परदेशी, गजानन देशमुख, चंदन बेंडवाल, निलेश वाघमारे, राहुल शेडगे, संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर पोळ, गणेश पोकळे, निलेश आल्हाट, पुरुषोत्तम विटेकर, अमित पापल, जगदीश दिघे, नागेश खडके, राजेश शेलार, अमर मारतकर, सूरज खंडाळे, सनी गायकवाड, सोमनाथ खांगटे तसेचमहिला आघाडीच्या पद्माताई सोरटे, सोनाली जुनावणे, गायत्री गरुड, गौरी चव्हाण आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१२ हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या पुणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली पेशवे पार्क येथील शिवसृष्टी आज धुळखात पडलेली आहे, ही बाब पुणेकरांसाठी लाजिरवाणी व संतापजनक आहे. प्रभागात भाजपचे तब्बल ५ नगरसेवक असतानाही शिवसृष्टीची ही दुरवस्था म्हणजे भाजपची शिवविचारांबाबतची उदासीनता व शिवद्रोही मानसिकता उघड करणारी आहे.शिवसृष्टीच्या दुरवस्थेस भाजप व महापालिका प्रशासन पूर्णतः जबाबदार असून, तात्काळ दुरुस्ती व देखभाल न झाल्यास शिवसेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

याच निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.“शिवद्रोही भाजपचा निषेध असो”, “शिवसृष्टीचा अपमान सहन करणार नाही”, “प्रशासनाची दिरंगाई बंद करा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून, अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय...

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता;पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे, दि. १० फेब्रुवारी...

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर वाडेकर,सभागृहनेते बिडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

पुणे :विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित...

प्रभाग ९ मधील मिसिंग लिंकबाबत चंद्रकांतदादा पाटील ॲक्शन मोडवर

आयुक्तांसोबत बैठक घेऊन मिसिंग लिंकच्या कामांना गती देण्याचे निर्देश ना....