पुणे -: सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार कै. विनायक निम्हण जिल्हास्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात श्रेयस मसलेकर याने 17,19 वर्षाखालील एकेरी व 17 वर्षाखालील दुहेरी गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलींच्या गटात ख्याती कत्रे हीने 13,15,17 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावत तिहेरी मुकुट पटकावला.
सनीज वर्ल्ड,पाषाण सुस रोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित श्रेयस मसलेकर याने आयुष पाटीलचा 16-14, 15-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. याच दुहेरीत अंतिम लढतीत श्रेयस मसलेकर याने ऋग्वेद भोसलेच्या साथीत माधव कामथ व नील शोरन यांचा 16-14,15-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात
श्रेयस मसलेकरने इशान मुदगलचा 15-12,15-10 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
13 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित ख्याती कत्रे हिने दुसऱ्या मानांकित समन्वया धनंजयचा 15-08, 15-06 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत ख्याती कत्रेने समन्वया धनंजयचा 15-04,15-04 असा पराभव विजेतेपदाचा मान पटकावला. 17 वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत ख्याती कत्रे हिने स्वरा मोरे चा 15-09,15-06 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
11 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित वेदांत मोरे याने दुसऱ्या मानांकित अर्चित खानदेशेचा 12-15, 15-13,15-12 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. याच मुलींच्या गटात अंतिम फेरीत ऋत्वा पांडे हिने पूर्वा हांडेचा 15-06, 15-09 असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कमोर्तब केले. 13 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित मीर शाहजार अलीने दुसऱ्या मानांकित अतिक्ष अग्रवालचा 15-13,15-13 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 15 वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित ध्रुव बर्वे याने पार्थ सहस्त्रबुध्देचा 15-08, 15-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक प्रशस्तीपत्रक अशी देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मा. श्री नवनाथ फडतरे, उपसंचालक,क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभाग,उद्योगपती सागर वलंज, सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिजीत मोहिते आणि रेफ्री अनिल भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: 11 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
वेदांत मोरे (1) वि.वि.आरूष सप्रे 15-04, 15-08;
अर्चित खानदेशे (2) वि.वि.कृष्णा सावंत 15-11, 15-05;
अंतिम फेरी: वेदांत मोरे (1)वि.वि.अर्चित खानदेशे (2)12-15, 15-13, 15-12;
11 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
ऋत्वा पांडे वि.वि अनिषा पिंगे 11-15, 15-08, 18-16;
पूर्वा हांडे वि.वि.कियारा साखरे(2) 15-09, 15-10;
अंतिम फेरी: ऋत्वा पांडे वि.वि.पूर्वा हांडे 15-06, 15-09;
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
मीर शाहजार अली(1)वि.वि.आरुष दुग्गल 15-09, 15-12;
अतिक्ष अग्रवाल(2)वि.विअन्वय समग 15-07, 15-13; अंतिम फेरी: मीर शाहजार अली(1) वि.वि.अतिक्ष अग्रवाल(2)15-13, 15-13;
13 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
ख्याती कत्रे (1) वि.वि.स्वरा मोर्ये 15-06, 15-05;
समन्वया धनंजय (2) वि.वि.शर्वरी वरवंटकर 15-10, 15-13;
अंतिम फेरी: ख्याती कत्रे (1) वि.वि.समन्वया धनंजय(2) 15-08, 15-06;
15 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
पार्थ सहस्त्रबुध्दे वि.वि.आरुष अरोरा(1)15-07, 15-04;
ध्रुव बर्वे(2) वि.वि.माधव कामथ 17-15, 08-15, 15-10;
अंतिम फेरी: ध्रुव बर्वे(2) वि.वि.पार्थ सहस्त्रबुध्दे 15-08, 15-12;
15 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
ख्याती कत्रे(1) वि.वि. अपूर्वा घोळवे 14-16, 15-04, 15-09;
समन्वया धनंजय (2) वि.वि.सिद्धी जगदाळे 15-08, 15-13;
अंतिम फेरी:ख्याती कत्रे(1)वि.वि. समन्वया धनंजय (2)15-04, 15-04;
17 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
आयुष पाटील वि.वि.वरद लांडगे(1) 15-05, 13-15, 15-09;
श्रेयस मसलेकर (2) वि.वि.इशान मुदगल 16-14, 15-10;
अंतिम फेरी: श्रेयस मसलेकर (2) वि.वि.आयुष पाटील 16-14, 15-10;
17 वर्षांखालील मुली: अंतिम फेरी:
ख्याती कत्रे वि.वि.स्वरा मोरे 15-09, 15-06;
19 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:
श्रेयस मसलेकर वि.वि.इशान मुदगल 15-12, 15-10;
17वर्षाखालील मुले दुहेरी:
ऋग्वेद भोसले/श्रेयस मसलेकर वि.वि.माधव कामथ/नील शोरन 16-14, ,15-09