नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र महिला सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये महिला सन्मान यात्रेचे आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी श्यामल दीक्षित यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. गोऱ्हे यांचां बैठकीत सत्कार केला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून लाडकी बहिण योजेनेसह इतर योजनांचा आढावा घेतला.वडीलांच्या सोबतच आईचे नाव लावणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे असे प्रतिपादन यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी कार्यक्रमात केले.तसेच महिलांनी नकारात्मक गोष्टी टाळून, सकारात्मक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा सल्ला देखील डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना दिला. माझी लाडकी बहिण योजनेवर टीका होत असताना डॉ. गोऱ्हे यांनी विरोधकांना शेतकरी कर्ज माफी ही भीक होती का ? असा आक्रमक सवाल डॉ.गोऱ्हे यांनी विचाराला.
यावेळी बैठकीत पूजा वाघ व श्यामला दीक्षित यांनी यावेळी बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पूजा वाघ (संपर्कप्रमुख नाशिक) श्यामला दीक्षित( नाशिक जिल्हा समन्वयक),श्रद्धा जोशी (नांदगाव – येवला जिल्हा प्रमुख),सुवर्णा मटाले, मंगला भास्कर,पूजा धुमाळ,अस्मिता देशमाने,मंदाताई जाधव,अंजली जोशी,संगीता लवंगे,पायल कुलकर्णी,मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.