पुणे – बदलत्या जीवनशैली प्रमाणे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्यांचे निदान आणि उपचार खर्चिक असतात सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाही याचा विचार करून या जगदीश मुळीक फाउंडेशने विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाच हजाराहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. त्यांच्या विविध आरोग्य तपासण्या आणि शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या असल्याचे वडगाव शेरीचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी सांगितले.
जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने येरवडा आणि विश्रांतवाडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा 5 हजार 500 जणांना लाभ घेतला. या कार्यक्रमात बाबत मुळीक यांनी माहिती दिली. या आरोग्य शिबारामध्ये हृदय रोग,स्त्रीरोग, बालरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया, डायलिसीस, रक्त तपासणी, डोळे तपासणी, चष्मेवाटप करण्यात आले. यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, माजी नगरसेवक डॉ सिध्दार्थ धेंडे, अनिल टिंगरे, ज्ञानेश्वर शिंदे, मंगेश गोळे, रावसाहेब खांडागळे, संतोष राजगुरू, सुहास राजगुरु, अतुल साळवे, राजाराम देवकर, डॉ मनोज बांगडे, चंद्रकांत जंजिरी, सुभाष चव्हाण, सचिन सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगदिश मुळीक म्हणाले की, वडगाव शेरी तील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे. या उद्देशाने आम्ही सातात्याने आरोग्य शिबीराचे आयोजन करत आहे. या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून नागरिकांच्या मोफत औषधे आणि आरोग्य चाचण्या केल्या जात आहे. नागरिकांना पालिकेचे आरोग्य कार्ड काढण्यासाठी मदत केली जात आहे. वडगाव शेरी तील प्रत्येक नागरिकांला ओरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.