पुणे – शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांकडून ध्वनी प्रदूषनाबाबत जनजागृती करणेकामी विविध उपक्रम राबविण्यात यावेत. अशा सूचना पुणे महापालिका आयुक्तांनी गणेश मंडळ आणि महापालिका प्रशासन यांना दिल्या आहेत. तसेच मंडळांस एक खिडकी योजने अंतर्गत विविध परवानग्या देण्यात याव्यात. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, पदपथावरील अतिक्रमण काढण्यात यावे. वाहतुकीबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. अश्या सूचना महापालिका आयुक्त यांनी प्रशासनास दिल्या आहेत. गणेशोत्सव ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी पुणे या गणेशोत्सात सर्वधर्मीय नागरिक मोठया प्रमाणावर उत्साहाने सहभागी शांततेने व शिस्तीने पार पाडण्याच्या दृष्टीने विचार विनीमय करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व पोलिस अधिकारी यांची काल ७ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे डॉ. राजेन्द्र भोसले, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस पृथ्वीराज बी.पी.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई), महेश पाटील, उप आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन), माधव जगताप, उप आयुक्त कर आकारणी व कर संकलन विभाग), सोमनाथ बनकर उप आयुक्त (अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग), आशा राऊत, उप आयुक्त (प्राथमिक शिक्षण विभाग व माध्यमिक व तांत्रिक विभाग संनियंत्रण), अनिरुध्द पावसकर, मुख्य अभियंता (पथ), नंदकिशोर जगताप,(पाणी पुरवठा विभाग) निशा चव्हाण, मुख्य विधी अधिकारी, डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, संजीव वावरे, सुरक्षा अधिकारी राकेश विटकर ,सहाय्यक वैदयकीय अधिकारी, सर्व परिमंडळांचे उपायुक्त सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त, संदिप सिंह गिल, पोलिस उप आयुक्त(झोन १) तसेच महानगरपालिकेतील अन्य अधिकारी व कर्मचारी आणि गणेशमंडळांचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, मंजुषा नागपुरे, बाबू बागस्कर, रविंद्र माळवदकर, मुकारी अलगुडे आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी खालीलप्रमाणे सुचना केल्या.
विदयुत विभाग : पुणे शहरातील सर्व विसर्जन घाटावर प्रकाश व्यवस्था करण्यात येईल तसेच एलईडी स्क्रीन उभारण्यात येईल. सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.गणेश उत्सव काळात शहरातील पथ दिवे रात्रभर चालू राहतील याची दक्षता घेतली जाईल.• सर्व क्षेत्रिय कार्यालये : गणेश मंडळे व घरगुती गणेश मुर्ती यांचे विसर्जन यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन पाटावर मंडप, हौद, पूजेसाठी टेबल उपलब्ध केले जाणार आहे.• शिक्षण विभाग : सर्व शाळांमध्ये युवा कार्यक्रम, व्यसन मुली जनजागृती, पीओपी मूर्ती ऐवजी पर्यावरण पूरक गणेश उत्सव निर्माल्य नदीत न सोडता निर्माल्य कलशा मध्ये सोडण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच मंडळ स्वच्छ राहील यासाठी जागृती करण्यात येणार आहे.• आरोग्य विभाग : डेंगू, हिवताप, चिकनगुणिया या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम तसेच मार्गदर्शन सूचना देण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी २ फिरल्या वाहिका तसेच २० रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण वाहिन्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.• माहिती तंत्रज्ञान : वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून जनजागृतीपर विविध मार्गदर्शन सूचना एलईडी स्क्रीनचा वापर करून प्रसिद्ध केल्या जाणार आहे.आकाश चिन्ह व परवाना : पुणे महानगरपालिकेमार्फत लवकरच मंडप धोरण तयार करण्यात येणार आहे. संबंधित खात्यास त्याबाबतची पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिने आहेत.• पाणी पुरवठा : गर्दीच्या ठिकाणी नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच विसर्जन घाटावर हौदामधील पाणीदेखील वारंवार बदलण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.अतिक्रमण विभाग : जिल्हाधिकारी कार्यालयासोबत समन्वय राखून गणेश मंडळे यांचे मंडपाची पाहणी करुन त्यांस ५० फुटापर्यंत मंडप घालणे व त्यात जाहिरात करण्यास परवानगी देण्यातबाबत संबंधितांस सूचना देण्यात आल्या आहेत.उदयान : वृक्ष प्राधिकरण यांची परवानगीनुसार विसर्जन मिरवणूक मार्गावर अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांदया छाटण्यात येतील.मालमत्ता व्यवस्थापन : मूर्ती विक्रेते यांना स्टॉल उभारणी परवानगी मोफत करणार परंतु यामुळे वाहतुकीला किंवा पादचारी यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी स्टॉल धारक व मूर्ती विक्रेते यांची एक बैठक घेवून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यास निर्देशित केले आहे.पथ- मिरवणूक मार्ग तसेच पुणे शहरातील खड्डे तात्काळ बुजविणेकामी युद्ध पातळीवर काम
करण्यात येईल.मलनिःसारण : गर्दीच्या ठिकाणी व विसर्जन मिरवणूक दरम्यान फिरते शौचालये उपलब्ध करुन
दिली जाणार आहेत. तसेच वेळेवेळी त्याची स्वच्छता केली जाणार आहे.• विसर्जन केलेले गणपती एकत्र करुन ते खाणीमध्ये सोडण्यासाठी वाहने तसेच पुजेचे साहित्य निर्माल्य लक्षात टाकण्याकरिता जागो-जागी निर्माल्य कलश उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
गणेश मंडळ कार्यकर्त्यांची भूमिका ;
•गणेशोत्सव बघण्यासाठी नागरिक येतात,कोणत्या भागात कोणते मंडळ आहे, याची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावावेत
• मंडळांचा खर्च वाढत असल्याने पालिकेने आर्थिक सहकार्य करावे
• महावितरणकडून महाग वीज दिली जात आहे,गेल्या वर्षीच्या डिपॉजिटची रक्कमही परत केली नाही. वीज दर कमी करावा
•संभाजी उद्यानासमोर मेट्रोच्या पादचारी पुलाची उंची केवळ १७ फुटांची आहे. मिरवणुकीचे रथ नेण्यास अडथळा निर्माण झाला.
- कार्यकर्ते काही चांगली कामे करतात, म्हणूनच लाखो लोक सहभागी होतात, त्यांना गुंड, रिकामटेकडे, मवाली समजू नये
– ध्वनिप्रदूषण, लेजर लाइटला ८५ टक्के कार्यकर्त्यांचा विरोध, पण वर्षभर साउंडच्या भिंती लावल्या जातात, त्यावर कुणाचाच आक्षेप नाही.
• आवाजच ७५ डेसिबलच्या आत असेल असे स्पीकर बनवा
• पोलिस कार्यकर्त्यांवर अन्याय करतात, चौकीत नेऊन बसवतात
● गणेश मूर्ती विक्रेत्यांना ३१ ऑगस्टपर्यंत परवानग्या द्याव्यात