Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने मिळवले हृदय प्रत्यारोपणात 100% यश!सन 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपणाच्या;शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण

Date:

“अवयव दान ही जीव वाचवणारी संधी आहे. निस्वार्थी भावनेने माणुसकी जोपासणारी अद्भुत कृती आहे” – अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील सीव्हीटीएसचे वरिष्ठ सल्लागार आणि हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद, डॉ. संजीव जाधव

पुणे : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 2017 पासून 10 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून यशाचा 100% निकाल लावत प्रत्यारोपण प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. एका विशेष कार्यक्रमात हृदय प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद आणि सीव्हीटीएस चे वरिष्ठ सल्लागार डॉ. संजीव जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पाडली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सीव्हीटीएस चे वरिष्ठ सल्लागार, हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे शल्यविशारद डॉ. संजीव जाधव यांनी अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील हृदय प्रत्यारोपण प्रक्रियेच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे.
या प्रसंगी डॉ. जाधव म्हणाले, “हृदय प्रत्यारोपणामुळे हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील व्यक्तींना पुन्हा एकदा नवी संधी मिळते. आम्ही केलेली हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया म्हणजे नवीन बाय-कॅव्हल (bi-caval) तंत्र होते, ज्यामध्ये रोगग्रस्त किंवा निकामी झालेले हृदय काढून टाकले जाते आणि त्याच्या जागी निरोगी दात्याने दिलेले हृदय बसवले जाते. बाय-कॅव्हल (bi-caval) तंत्र ऍट्रिया किंवा हृदयाच्या वरच्या चेंबरची सामान्य शरीर रचना कायम राखते आणि शस्त्रक्रियेदरम्यान व शस्त्रक्रियेनंतर गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथील सर्वसमावेशक हृदयविज्ञान प्रक्रिया हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या व्यक्तींसाठी जीवनरक्षक उपाय प्रदान करते. आजपर्यंत 100% यशाच्या दरासह 10 हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्ण करून अद्वितीय यश मिळवल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे.”
डॉ. जाधव यांनी हृदय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून जीवनात बदल घडलेल्या रुग्णांची ओळख करुन दिली. मुंबईतील मुलुंड येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय पुरुष रुग्णामध्ये डायलेटेड कार्डिओमायोपॅथी (डीसीएमपी) आणि 15% एवढे लेफ्ट वेंट्रिक्युलर इजेक्शन फ्रॅक्शन (एलव्हीईएफ) चे निदान झाले होते, त्यामुळे 15 जुलै 2021 रोजी त्यांच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल हृदय प्रत्यारोपणाची प्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर, रवी यांच्यामध्ये उल्लेखनीय सुधारणा दिसून आली, ज्यामध्ये एलव्हीईएफ 60% पर्यंत वाढले. 3 ऑगस्ट 2021 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि आज ते परिपूर्ण आयुष्य जगत आहेत.

आणखी एक रुग्ण म्हणजे नाशिकमधील 40 वर्षीय पुरुष रुग्णाला इस्केमिक कार्डिओमायोपॅथी आणि 10% एवढे इजेक्शन फ्रॅक्शन (ईएफ) होते, या प्रक्रियेद्वारे त्यांनाही जगण्याची नवी आशा मिळाली आहे. 20 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्यावर ऑर्थोटॉपिक बाय-कॅव्हल (bi-caval) हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली, मग शस्त्रक्रियेनंतरच्या इकोकार्डियोग्राममध्ये 50% ईएफ दिसून आले. 16 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि आता ते पुन्हा सामान्य जीवन जगत आहेत.
आणखी एक आव्हानात्मक प्रकरण म्हणजे रायगडमधील 30 वर्षीय पुरुष रुग्णाला रिस्ट्रिक्टिव्ह इन्फिल्ट्रेटिव्ह कार्डिओमायोपॅथी आणि हृदयाच्या एमायलॉइडोसिसने ग्रासले होते. 4 मे 2023 रोजी त्यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली आणि त्यांना 22 मे 2023 रोजी उत्कृष्ट बाय-वेंट्रिक्युलर कार्य होत असल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बुलढाण्यातील 31 वर्षीय पुरुष रुग्णाचा आजार अंतिम टप्प्यात होता आणि 10% ईएफ होते, तसेच यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यातून ते बचावले होते. 6 डिसेंबर 2023 रोजी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि याचा परिणाम म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ईएफ 50% एवढे झाले आणि म्हणून त्यांना 22 डिसेंबर 2023 रोजी डिस्चार्ज देण्यात आला.

सर्वात अलीकडे मिळाले यश म्हणजे सोलापूरमधील 30 वर्षीय पुरुष रुग्णाला इस्केमिक हृदयरोग झाला होता आणि 20% ईएफ होते. 15 मार्च 2024 रोजी त्यांच्यावर प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली, पुढे प्रत्यारोपणानंतर चांगला इकोकार्डिओग्राम परिणाम आला आणि ते लवकर बरे होऊ लागले म्हणून 4 एप्रिल 2024 रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डॉ. संजीव जाधव यांनी अवयव प्रत्यारोपणाच्या व्यापक सामाजिक लाभांवर देखील भाष्य केले. 
ते म्हणाले, “अवयव दान म्हणजे जीव वाचवणारी प्रक्रिया आहे आणि याद्वारे हृदयविकाराच्या रुग्णांना आयुष्य जगण्याची एक नवी संधी दिली जाते. हीच खरी मानवता आहे. या रूग्णांमध्ये यशस्वी हृदय प्रत्यारोपण झाले आणि त्यांना नवीन जीवन मिळाले, म्हणून आम्हाला आशा आहे की याद्वारे अवयवदानाच्या अतिशय महत्वाच्या गरजेबद्दल जागरुकता वाढेल आणि अधिक लोकांना अवयव दान करण्याची प्रेरणा मिळेल.” अपोलो हॉस्पिटल्सचे पश्चिमी क्षेत्राचे प्रादेशिक सीईओ श्री संतोष मराठे म्हणाले, "हृदय प्रत्यारोपणात 100% यशाचा टप्पा गाठणे हा अभिमानाचा क्षण आहे, खरंतर हा आमच्या डॉक्टरांच्या आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्समधील हृदय प्रत्यारोपण टीमच्या कौशल्याचा पुरावा आहे.

ओपोलो येथील महत्वाच्या अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेत हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाचा समावेश आहे आणि ही प्रक्रिया प्रख्यात शल्यचिकित्सकांच्या नेतृत्वात पार पाडली जाते. विशेष म्हणजे या टीममध्ये नेफ्रोलॉजिस्ट (मेघविद्यातज्ञ), हेपॅटोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट (मूत्ररोगतज्ञ), इंटेन्सिव्हिस्ट (अतिदक्षता तज्ञ), रेडिओलॉजिस्ट (क्ष-किरणशास्त्रज्ञ), प्रत्यारोपण समन्वयक, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार तज्ञांसह विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असतो. 2017 सुरुवातीपासून, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने 348 मूत्रपिंड प्रत्यारोपण, 204 यकृत प्रत्यारोपण आणि 10 हृदय प्रत्यारोपण पार पाडले आहेत.
आम्ही झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) आणि वाहतूक नियामक अधिकाऱ्यांचे आभारी आहोत, कारण त्यांनी वेळेवर अवयव पोहोचण्यासाठी प्रशासनात्मक आणि ग्रीन कॉरिडॉर मार्गासाठी सहकार्य केले. अवयव प्रत्यारोपण करण्यास पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही दात्यांच्या कुटुंबांचे आभारी आहोत आणि कृतज्ञ आहोत. आम्हाला विश्वास आहे की या यशस्वी प्रत्यारोपणामुळे अधिकाधिक लोकांना अवयव दान करण्याची प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखी जीव वाचविण्याची आम्हाला संधी मिळेल.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...