गेल्या महिन्यात 65,105 कोटी रुपये सकल वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित; 11% वार्षिक वाढ

Date:

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2023

देशात जुलै 2023 मध्ये संकलित झालेला सकल वस्तू आणि सेवा कर महसूल 1,65,105 कोटी रुपये असून त्यापैकी 29,773 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, 37,623 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर, तर 85,930 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 41,239 कोटी रुपयांसह) आणि 11,779 कोटी रुपये उपकर (वस्तूंच्या आयातीतून संकलित केलेल्या 840 कोटी रुपयांसह) रुपात संकलित करण्यात आले आहेत.

सरकारने, एकात्मिक वस्तू आणि सेवा करापैकी 39,785 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 33,188 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात मंजूर केले आहेत. नियमित मंजूरीनंतर, जुलै 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 69,558 कोटी रुपये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच 70,811 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर इतका आहे.

देशातील जुलै 2023 चा  महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील वस्तू आणि सेवा कर महसुलाच्या तुलनेत  11% ने अधिक आहे. या महिन्यात, देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुला च्या तुलनेत   15% ने अधिक  आहे. सकल वस्तू आणि सेवा कर संकलन पाचव्यांदा 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

महाराष्ट्राच्या वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्याने वाढ झाली असून जुलै 2023 मध्ये 26064 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. महाराष्ट्रात जुलै 2022 मध्ये 22,129 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला होता.

गोवा राज्याच्या  वस्तू आणि सेवा कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे असून जुलै 2023 मध्ये 528 कोटी रुपये कर महसूल संकलित झाला आहे. गोव्यात जुलै 2022 मध्ये 433 कोटी रुपये कर संकलन झाले होते.

महाराष्ट्रात, जुलै 2023 महिन्यात 7,958 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले तर 4167 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 12,124 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

गोव्यात, जुलै 2023 महिन्यात 173 कोटी रुपये राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात संकलित करण्यात आले, तर 146 कोटी रुपये एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग म्हणून राज्याला मिळाले. अशा प्रकारे राज्यात एकूण 320 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर संकलित झाला आहे .

खालील तक्ता चालू वर्षातील मासिक सकल वस्तू आणि सेवा कर महसुलातील चढउतार दर्शवितो. तक्ता-1 जुलै 2022 च्या तुलनेत जुलै 2023 मध्ये प्रत्येक राज्यात गोळा केलेल्या वस्तू आणि सेवा कराची राज्यनिहाय आकडेवारी दर्शवितो तर, तक्ता-2 मध्ये जुलै ‘2023 या महिन्यात, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी प्राप्त/निश्चित करण्यात आलेला एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कर तसेच राज्य वस्तू आणि सेवा कराचा भाग दर्शवतो.

जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर महसुलाची राज्यवार वाढ [1] (कोटी रुपयांमध्ये)

State/UTJuly’22July’23Growth(%)
Jammu and Kashmir43154927
Himachal Pradesh74691723
Punjab1733200015
Chandigarh17621723
Uttarakhand1390160716
Haryana6791795317
Delhi4327540525
Rajasthan367139889
Uttar Pradesh7074880224
Bihar1264148818
Sikkim24931426
Arunachal Pradesh657413
Nagaland42433
Manipur4542-7
Mizoram273947
Tripura637823
Meghalaya13817527
Assam1040118314
West Bengal4441512815
Jharkhand2514285914
Odisha3652424516
Chhattisgarh269528054
Madhya Pradesh2966332512
Gujarat918397877
Daman and Diu31335413
Dadra and Nagar Haveli
Maharashtra221292606418
Karnataka97951150517
Goa43352822
Lakshadweep2245
Kerala2161238110
Tamil Nadu84491002219
Puducherry1982169
Andaman and Nicobar Islands233132
Telangana454748497
Andhra Pradesh340935935
Ladakh202313
Other Territory2162264
Center Jurisdiction16220929
Grand Total10658012302615

वस्तूंच्या आयातीवरील वस्तू आणि सेवा कर समाविष्ट नाही.

जुलै 2023 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना प्रदान करण्यात आलेल्या एकात्मिक वस्तू आणि सेवा करातील राज्य वस्तू आणि सेवा कराच्या भागाची रक्कम तसेच राज्य वस्तू आणि सेवा कर (कोटी रुपयांमध्ये)

State/UTSGST collectionSGST portion of IGSTTotal
Jammu and Kashmir234429663
Himachal Pradesh233285518
Punjab72711381865
Chandigarh57133190
Uttarakhand415210625
Haryana161012562866
Delhi122116062827
Rajasthan138018193199
Uttar Pradesh275134266176
Bihar71814692187
Sikkim305383
Arunachal Pradesh37113150
Nagaland187088
Manipur235880
Mizoram225779
Tripura4086125
Meghalaya5099149
Assam4516961146
West Bengal195315313483
Jharkhand7213301051
Odisha13004161716
Chhattisgarh6273821009
Madhya Pradesh104515812626
Gujarat329319175210
Dadra and Nagar Haveli and Daman and Diu562985
Maharashtra7958416712124
Karnataka318126505831
Goa173146320
Lakshadweep21314
Kerala109314412534
Tamil Nadu330021195419
Puducherry415799
Andaman and Nicobar Islands112537
Telangana162317223345
Andhra Pradesh119915562755
Ladakh114758
Other Territory195575
Grand Total37623331887081
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...

राष्ट्रीय कला उत्सवाला जल्लोषात सुरुवात

पुणे दि. २०: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय...