पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर असतील. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्याचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करणार आहेत. या व्यतिरीक्त ते विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण देखील करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल झाले तेव्हा राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.



