मेट्रो-उदघाटने करतांना, “मेट्रो स्टेशन्स पार्किंग सुविधांची” मोदीं नी दखल घ्यावी..!
पुणे – जाहिरातदार संस्थांच्या फलकांवरील ‘विविध ऊत्पादकांच्या जाहीरातींचे करारनामे चालु असतांना, अरेरावीने, होर्डिंग्ज व्यवसाईकांना न विचारता होर्डिंग्जच्या लॅाक सिस्टीम मधील लोखंडी कापून मोदींच्या स्वागताचे फ्लेक्स लावले गेले. मनपा प्रशासनातील अधिकारी व सेवकांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागताचे अतिरेकी फ्लेक्स दादागिरीच्या पद्धतीने ,अतिक्रमणे करून लावल्याचा आरोप काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला.
पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या “१०० स्मार्ट सिटी प्रकल्पातील ‘पुणे शहराचा’ व मेट्रोचे उदघाटन केलेल्या ‘मेट्रो स्टेशन्स च्या पार्किंग सुविधांचा’ मागोवा व माहीती पंतप्रधान मोदी जींनी घेण्याची मागणी ही तिवारी यांनी येथे केली. मेट्रो स्टेशन्स जवळ “खाजगी वाहनांच्या पार्किंग ची किमान सोय ही नसेल” तर मेट्रोचा वापर पुणेकर नागरीक कसा करणार असा सवाल देखील केला. शहरातील वहातुक कोंडी व प्रदुषण कमी करण्यासाठी दिल्ली प्रमाणे मेट्रो सेवेचा वापर जर लोकांनी जास्तीत जास्त करावा असे वाटत असेल तर त्या प्रमाणात मेट्रो_स्टेशन्स जवळ ‘किमान पार्किंगची सुविधा’ मात्र करण्यात आली नाही हे अदुरदर्शीपणा नियोजन शुन्यतेचेच हे लक्षण असल्याची टिका त्यांनी केली.
तसेच,भाजपचे सत्ताधारी नेते दबावतंत्राचा वापर करीत,मनपा आयुक्त व प्रशासनावर दबाव आणून, मनपा कडून जाहिरातदार संस्थांच्या फलकांवरील ‘विविध ऊत्पादकांच्या जाहीरातींचे करारनामे चालु असतांना, अरेरावीने, होर्डिंग्ज व्यवसाईकांना नविचारता होर्डिंग्जच्या लॅाक सिस्टीम मधील लोखंडी कापून मोदींच्या स्वागताचे फ्लेक्स लावले गेले. मनपा प्रशासनातील अधिकारी व सेवकांच्या माध्यमातून मोदींच्या स्वागताचे अतिरेकी फ्लेक्स लावल्याचा आरोप तिवारी यांनी केला, ते म्हणाले ,
होर्डिंग्ज व्यवसाईकांवर अरेरावीने, दडपशाहीने, मनपा – अघिकाऱ्यांच्या दमबाजीने या जाहीराती लावल्याचे समजते आहे. होर्डिंग्ज व्यवसाईक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांमध्ये या नुकसानी विषयी तीव्र चिंता व नाराजी व्यक्त केली गेली.
“मोदी स्वागताची अतिरेकी आतषबाजी” करून, करोडोंच्या पैशांची ऊधळपट्टी करण्याचे व पुणे शहर विद्रुप करण्याचे काम भाजपने केले असल्याचा आरोप ही त्यांनी केला .

