पुणे- शहरात रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर महिनोंमहिने चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. अशा वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत २२ वाहने जप्त केली आहेत. नागरिकांनी त्यांची वाहने काढून घ्यावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.शहरात वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच पार्किंगची समस्याही निर्माण झाली आहे. शहरातील अनेक नागरिक त्यांची बंद पडलेली वाहने रस्ता, पादचारी मार्गावर लावतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच, पण कचरा टाकून अस्वच्छतेमुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यापार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.महापालिकेने जप्त केलेली वाहने एका महिन्याच्या आत शुल्क भरून सोडवून घेता येतील. यामध्ये प्रवासी बस, ट्रकसाठी २५ हजार रुपये, हलकी वाहने (१० टना पर्यंत) २० हजार रुपये, कार, जीपसाठी १५ हजार, रिक्षा, टेम्पोसाठी १० हजार तर दुचाकीसाठी ५ हजार रुपये शुल्क आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याचा लावलेले त्यांची बंद स्थितीतील वाहने नोटीस लावल्यानंतर सात दिवसाच्या आत तेथून काढून घ्यावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेतर्फे बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू
Date:

