मराठी अभिनेता रवींद्र महाजनी यांचे निधन; बंद फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह, मृत्यू 2-3 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज

Date:

पुणे-मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. 80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. आज ते आपल्यात नाहीत, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.मावळच्या तळेगाव दाभाडे येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे.गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.

तळेगाव MIDC पो स्टे हद्दीत एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे मराठी सिने अभिनेता रवींद्र हनुमंत महाजनी (वय 77 वर्षे) बंद फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आले आहेत. ते गेले 7- 8 महिन्यापासून वरील ठिकाणी एकटेच राहण्यास होते. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा गश्मिर यांना कळविण्यात आली असून ते तळेगाव येथे आल्यानंतर मृतदेहाचे पोस्ट मोर्टेम करून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

या एव्हरग्रीन अभिनेत्याच्या करिअरची सुरुवात टॅक्सी चालवण्यापासून झाली होती. अभिनेता रविंद्र महाजनी हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. अभिनय क्षेत्रात पाय ठेवण्यापूर्वी ते टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांनी साधारणपणे 3 वर्षे मुंबईत टॅक्सी चालवली. मात्र, त्यांच्यातील एक कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत आणि रात्री टॅक्सी चालवत. रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केले होते. यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारखे प्रसिद्ध चित्रपट दिले. एवढेच नाही, तर ते बॉलिवूडमध्येही झळकले. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

रवींद्र महाजनी यांच्या अपार्टमेंटमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या आदिका वारंगे नामक महिलेने त्यांच्याशी झालेल्या अखेरच्या संवादाची माहिती दिली आहे. या महिलेने सांगितले की, मी या इमारतीत दररोज कचरा घेण्यासाठी येत होते. मंगळवारी मी रवींद्र महाजनी यांना अखेरचे पाहिले. त्यानंतर बुधवारी माझी साप्ताहिक सुट्टी होती. गुरुवारी ते झोपले असावेत या विचाराने मी त्यांचे दार ठोठावले नाही. त्यानंतर ते दिसले नाही. कचरा देताना ते थोडेफार बोलायचे. तेवढाच आमच्यात संवाद व्हायचा. शुक्रवारी कचऱ्यासाठी गेले असता त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याचे जाणवले. मी त्याची माहिती माझ्या वरिष्ठांना दिली.

मी दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांचा आवाज यायचा. पण काल आतून त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असेही आदिती वारंगे यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे, पोलिसांनी महाजनी यांच्या मृतदेहाची स्थिती पाहून त्यांचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गश्मीरच्या मातोश्री आजारी असल्यामुळे त्यांच्यापासून ही बातमी लपवून ठेवण्यात आल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे ते म्हणाले.

मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी – शरद पवार

आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रविंद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे शरद पवार म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा या २२ प्रभागातील ५९ जागांवर दावा

पुणे- भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या नंतर आता आज...

‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

‘नाफा स्ट्रीम’(NAFA STREAM) नॉर्थ अमेरिकेत मराठी मनोरंजनाच्या कक्षा विस्तारणार!"स्वतंत्र...

मुंबई हायकोर्टासह नागपूर, वांद्रे कोर्ट ‘बॉम्ब’ने उडवण्याची धमकी

मुंबई-येथील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची...

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत,77 जागांवर चर्चा,227 जागांवर महायुती लढेल

मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन...