महिलांना समान न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा

Date:

पुणे:महिलांना समान न्याय मिळावा यासाठी देशात समान नागरी कायदा महत्त्वाचा असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले.

डीईएस श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ॲड. श्रीहरी बोरीकर, डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, संचालक मंडळाचे सदस्य महेश आठवले, ॲड. अशोक पलांडे, प्रभारी प्राचार्या डॉ. सुनिता आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अरोरा म्हणाल्या, आपल्या देशात कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. फक्त कौटुंबिक कायद्यात समानता नाही. त्यातही विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक याबाबतचे कायदे वेगवेगळे आहेत. त्यामुळे महिला आणि मुलांमध्ये भेदभाव होतो. तो टाळण्यासाठी समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे.

अरोरा पुढे म्हणाल्या, आपण सर्व भारतीय म्हणून राज्यघटना स्वीकारली आहे. यात कुठल्याही धर्माचा संबंध येत नाही. राष्ट्राला धर्म नाही. समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि गरिमापूर्ण जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले आहेत.

बोरीकर म्हणाले, देशाच्या विकासासाठी समान नागरी कायदा आवश्यक आहे. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येकाने आपला सहयोग दिला पाहिजे. भारताच्या सोनेरी भविष्यासाठी आपले उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकत कर,पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थावरुन प्रशासनाला धरले धारेवर…

LIVE - पुणे महापालिका मुख्य सभा 18 फेब्रुवारी 2026 पुणे...

वित्तीय समिती रद्द करा नगरसेवकांची पहिल्याच सभेत मागणी

पुणे - आज पुणे महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित...

जगदाळे कुटुंबासह खासदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट

पुणे: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित जगदाळे कुटुंबातील प्रगती जगदाळे...