पुणे:आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ अंतर्गत झालेल्या परीक्षांचे रीचेकिंगचे निकालाला विलंब झाला असून ते त्वरित जाहीर करावेत अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखालीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (D.BATU) चे विभागीय केंद्र समन्वयक यांना यासंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले.
विद्यापीठ अंतर्गत घेतल्या गेलेल्या परिक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले होते सदर निकाला मध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी तसेच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे दिसुन आले असता विद्यार्थ्यांनी रीचेकिंग, Revaluation चे अर्ज (D.BATU ) कडे सादर केले असून सदरची प्रक्रिया व अंतिम निकाल अजून जाहीर करण्यात आले नव्हते. विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण विषयाची पुनः परिक्षा (4th Semester) देखील दिली होती. तरी देखील रीचेकिंग, Revaluation चे निकाल अजून जाहीर झाले नाही.
या संदर्भात डॅा. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ( D. BATU ) चे विभागीय केंद्र समन्वयक यांच्या कडे निवेदना द्वारे विनंती केली की निकाल त्वरीत जाहीर करावा व विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासातून सुटका करावी व सदर मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी शुभम अंकुश माताळे,श्रीकांत बालघरे, ऋषिकेश कडू, जयजगदिश कोंढाळकर, रोहन जोशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

