पुणे- मुंढवा पोलिस स्टेशन आणि हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात 75 ते 80 पोलिसांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे, मुंढवा सह्याद्री हॉस्पीटलकडील डॉ. प्रसाद जाधव, डॉ. विजय गायकवाड, डॉ. शुभम श्रीवास्तव, डॉ. रेश्मा नवले, डॉ. रोशनी जाधव, डॉ. प्रेमनाथ मोरे, डॉ. विराज साकले यांच्यासह 75 ते 80 पोलिस अंमलदार सहभागी झाले होते.
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना स्वतःचे आरोग्य व शारिरिक स्वास्थ तसेच व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन केले. तेसच दैनंदिन कर्तव्या बरोबर व्यायाम, योगा, ध्यान इत्यादीचे माध्यमातून स्वतःची काळजी घेणे बाबत मार्गदर्शन केले. शिबीरामध्ये सर्व अधिकारी व पोलिस अंमलदार यांच्या सीबीसी शुगर, लिक्वीड प्रोफाईल इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.आरोग्य तपासणी शिबीर पोलिस आयुक्त रितेश कुमार , सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, यांच्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे,पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे, पोलिस अंमलदार तानाजी देशमुख, स्वप्निल शिवरकर, रविंद्र देवढे,आणि शितल काळे व इतर स्टाफ यांनी यशस्वी केले.

