मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना सिद्धगड तर दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला मिळाला आहे. आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाही. मंत्र्यांना बंगले आणि दालनांचे वाटप झाले हसन मुश्रींफांना विशालगड बंगला तर 407 क्रमांकांचे दालन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 मंत्र्यांना शासकीय निवास्थाने वाटप करण्यात आली असून आदिती तटकरे यांचा मात्र, यात उल्लेख करण्यात आला नाहीये. तर छगन भुजबळ यांना मंत्रलायत दुसऱ्या मजल्यावरील दालन क्रमांक 201 देण्यात आले आहे. हसन मुश्रीम यांना चौथ्या मजल्यावर दालन क्रमांक 407 मिळाले आहे. दिलीप वळसे पाटील आणि संजय बनसोडे यांना तिसऱ्या मजल्यावरील अनुक्रमे 303 आणि 301 दालन मिळाले आहे. धनंजय मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावरील 201 ते 204 आणि 212 ही दालने मिळाली आहेत. धर्मरावबाबा आत्रम यांना सहाव्या मजल्यावर 601,602 आणि 604 ही दालने मिळाली आहेत. आदिती तटकरे यांना पहिल्या मजल्यावर 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे.
बंगल्याचे वाटप पुढील प्रमाणे
- छगन भुजबळ – सिद्धगड
- दिलीप वळसे पाटील – सुवर्णगड,
- धनंजय मुंडे – प्रचितगड
- धर्मरावबाबा आत्राम – सुरूचि – 3
- अनिल पाटील – सुरूचि – 8
- संजय बनसोडे – सुरूचि – 18


