पुणे-शिवाजीनगर पोलिसांनी मनपा ब्रिजच्याखाली बावधन बस स्टॉपकडे पायी जाणार्या महिलेचा विनयभंग करणार्याला अटक केली आहे. लक्ष्मण तुकाराम घोडे (45, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 2 जुलै 2023 रोजी शिवाजीनगर येथील मनपा ब्रिजच्या खालुन फिर्यादी महिला बावधन बस स्टॉपकडे पायी जात होत्या. त्यावेळी अंधारात खुडे चौकाकडुन मनपा ब्रिजच्या दिेशेने एकजण आला आणि तो फिर्यादीच्या अंगावर गेला. त्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यादिवशी पासुन मनपा ब्रिजखाली रात्री 8 ते 12 वाजण्याच्या दरम्यान नजर ठेवली तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, पोलिसांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण तुकाराम घोडे याला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे.
मनपा ब्रिजच्या खाली महिलेचा विनयभंग करणार्याला अटक
Date:

