कसबा निवडणूक :शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांना बरोबर घेऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन प्रचार करत असल्याने हा प्रकार गंभीर असून याची तातडीने निवडणूक आयोगाने दाखल घेतली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात कोयता गैंग ला ठोकून काढू ,त्यांची दहशत मोडून काढू ,आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री आणि फडणवीस यांचेच घनिष्ठ सहकारी , ज्यांना पुणे सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे आणि ते जामिनावर बाहेर असताना त्यांनाच घेऊन सोसायट्यांमध्ये बैठका करतात याकडे लक्ष वेधले आहे . याप्रकरणाचा पर्दाफाश व्हायलाच हवा , याम्गे दहशत पसरविण्याचा तर मंत्री महोदयांचा प्रयत्न नाही ना ? असा प्रश्न हि उपस्थित होत असल्याचे पाटील यांनी सांगितले सोशल मिडिया वर मंत्री महाजन आणि संबधित गुन्हेगार हे बैठका घेत असल्याचे फोटो ,व्हिडीओ दिसून आलेले आहेत त्यावरून रुपाली पाटील यांनी हे आक्षेप घेतले आहेत. नेमके रुपाली पाटील यांनी काय म्हटले आहे ते ऐका त्यांच्याच शब्दात
अजित पवार म्हणाले हे खपवून घेणार नाही
गिरीश महाजन प्रचारामध्ये एका आरोपीसोबत दिसले होते. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, हे अत्यंत चुकीचे आहे. पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे. मंत्री असे वागत असतील, गुंड प्रवृत्तीला घेऊन दहशत निर्माण केली जात असेल तर इथल्या आयुक्तांनी नोंद घेतली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीचे वागत असतील तर पुण्यात हे खपवून घेणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.