पुणे-रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम लावुन मोठया आवाजात संगीत वाजविणार्या रेस्टॉरंट अॅन्ड बारवर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे. पोलिसांनी 4 लाख रूपये किंमतीची साऊंड सिस्टीम देखील जप्त केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा परिसरातील काही रेस्टॉरंट अॅन्ड बारमध्ये रात्री 10 नंतर मोठया आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असते. मिळालेल्या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कल्याणीनगर परिसरातील निलांजली सोसायटीतील गौरीशंकर कल्याणी बंगोल सो. ले नं. 2, सेंट्रल अॅव्हेन्यु येथील एलिफंट अॅन्ड को. रेस्टॉरंट अॅन्ड बारवर छापा टाकला. तेथे मोठया आवाजात डीजे सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करून तेथील 4 लाख रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम जप्त केले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे , पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव , सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे , सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील , पोलिस अंमलदार अजय राणे, हनमंत कांबळे, अमेय रसाळ आणि अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

