कुटुंब पद्धतीमुळे भारतात सामाजिक सुरक्षा-खासदार प्रकाश जावडेकर

Date:

पुणे-पाश्चात्य देशांमध्ये एका कुटुंबात सरासरी 2.5 व्यक्ती असतात, तर भारतात 4.5 व्यक्ती असतात. याचा अर्थ आपल्याकडे तीन पिढ्या एकत्र नांदत असल्याने ज्येष्ठांची काळजी घेतली जाते, नातवंडांवर संस्कार होतात. या कुटुंब पद्धतीमुळे आपल्या देशात सामाजिक सुरक्षा असल्याचे मत खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सामान्य परिस्थितीतून बालविवाह, पुनर्विवाह असा संघर्ष करीत यशस्वी व्यवसाय करणाऱ्या आणि गरजवंतांसाठी मायेची सावली असणाऱ्या माई कुलकर्णी यांच्या जीवनातील संजय कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या महत्त्वाच्या लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन संयोजक रविंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जावडेकर म्हणाले, ”भारतीय कुटुंब व्यवस्थेत कुटुंबाचे व्यवसाय, आचार, विचार, परंपरा यांना महत्त्व आहे. अन्य देशांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असणारी कुटुंब व्यवस्था ही आपली ताकद आहे. ‘माई’ या भारतीय कुटुंब व्यवस्थेचे प्रतिक आहेत.”

जोशी म्हणाले, ”आईजवळ व्यवस्थापन शिकता येते, परंतु आजच्या मुलीला आई व्हायचे नाही. हा विरोधाभास संपवून कुटुंब व्यवस्थेचा वसा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या मनात ‘माई’ असणे आवश्यक आहे.”

रमा कुलकर्णी यांनी स्वागत व सूत्रसंचालन, संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक आणि ऋता कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर.

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७,...

महावितरणला हरित ऊर्जा शिखर परिषदेत मानाचा पुरस्कार

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२६: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी...

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...