पत्रकार वारिसेंच्या हत्याऱ्यांना राणेंनी पोसले:विनायक राऊत यांचा गंभीर आरोप

Date:

मुंबई:

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.​​​​​​नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.

राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.खासदार विनायक राऊत म्हणाले की, “गुंडगिरी करणारा हा नीलेश राणे आणि नारायण राणे यांच्यासोबत राहणारा गुंड आहे. त्यांच्या चिथावणीखोरीमुळे वारिसे यांच्यासारख्या पत्रकारांची हत्या करण्यात येत आहे.” असा आरोप राऊत यांनी राणेंवर केला आहे. तर याप्रकरणी निलेश राणे यांनी देखील ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

“मला विनायक राऊत यांना एक प्रश्न विचारायचा आहे की, हाच आरोपी एक-दीड महिन्यांपूर्वी कलेक्टर ऑफीसमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत उपस्थित होता की नाही, रिफायनरीच्या किती मीटिंगमध्ये हा व्यक्ती आणि साळवी भेटले, आणि मागच्या वर्षभरात कितीदा भेट झाली, याचा राजन साळवी आणि विनायक राऊत यांनी खुलासा करावा.​​​​​नारायण राणेंवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे खुश होतात म्हणून विनायक राऊत टीका करत आहेत. त्यांची खासदारकीची कामे संपली आहे असं वाटतंय. आता किती वर्ष उद्धव ठाकरेंची भांडी घासणार आहे? असा खोचक टोला देखील यावेळी निलेश राणेंनी लगावला.राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यासह कोकणात अलिकडच्या काळात ज्या चार पाच हत्या झाल्या. त्याची केंद्र सरकारने स्पेशल टीम मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली. तसेच वारिसे यांच्या हत्याकांडामागचा मास्टरमाइंड कोण आहे हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे, असा दावा करतानाच वारिसे यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...