कुस्तीमध्ये समृद्धी, उत्कर्ष व महादेव यांचे रूपेरी यश

Date:

तृप्ती गुरव व प्रणय चौधरी यांना कास्य

भोपाळ-महाराष्ट्राच्या समृद्धी घोरपडे,उत्कर्ष ढमाळ व महादेव माने या कुस्तीगीरांना येथे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर तृप्ती गुरव व प्रणय चौधरी यांनी कांस्यपदक मिळविले.तात्या टोपे क्रीडा नगरीत आजपासून सुरू झालेल्या कुस्त्यांच्या लढतीपैकी मुलींच्या ४६ किलो गटात समृद्धी हिला हरियाणाच्या मुस्कान हिने चिवट लढतीनंतर १२-६ असे हरविले. ही लढत अतिशय रंगतदार झाली. मात्र मुस्कानच्या ताकदवान खेळापुढे समृद्धीचा बचाव निष्प्रभ ठरला.

कांस्यपदकाच्या लढतीत तृप्तीने दिल्लीच्या ज्योती कुमारी हिला ४-० असे सहज पराभूत केले.
मुलांच्या ५१ किलो गटात उत्कर्ष याला छत्तीसगडच्या मनु यादव याने ४-० असे हरविले. उत्कर्ष पेक्षा यादव हा अधिक बलवान होता, त्यामुळेच उत्कर्ष याला अपेक्षित डावपेच करता आले नाहीत. ६० किलो गटाच्या अंतिम फेरीत महादेव याला हरियाणाच्या आशिष कुमार याने उत्कंठापूर्ण लढतीनंतर ३-१ असे नमविले. याच गटातील कांस्यपदकाच्या लढतीत चौधरी यांनी उत्तर प्रदेशच्या जुबेर याचा ६-५ असा पराभव केला. ही कुस्ती अतिशय रंगतदार झाली मात्र महाराष्ट्राच्या चौधरी याने शेवटपर्यंत वर्चस्व ठेवीत विजयश्री संपादन केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...