Ø ऊस पिकामध्ये शाश्वत, उच्च उत्पन्न देणाऱ्या लागवडीला प्रोत्साहन
Ø २५ पेक्षा जास्त गावांमधील २०० हून अधिक शेतकरी या मेळाव्यात उपस्थित
Ø २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पांतर्गत १०,००० एकर क्षेत्राची नोंदणी करण्याचे आणि उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ करण्याचे यूपीएल (UPL) चे उद्दिष्ट
पुणे, २१ एप्रिल, २०२३: शाश्वत कृषी उपाय आणि समाधाने प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी युपीएल सस्टेनेबल अॅग्री सोल्युशन्स लिमिटेडने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यासह ऊस पिकामध्ये शाश्वत उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी आणि गेल्या वर्षी लॉंच झालेल्या ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शुक्रवारी पुणे येथे ‘शुगरकेन प्रोन्यूटिवा मेळावा’ आयोजित केला होता.
जे पीक उत्पादन वाढविण्यास व मातीची पोत आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते असे एक शाश्वत कृषी उपाय असलेले प्रोन्यूटिवा पॅकेज आणि ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाचे यश शेतकऱ्यांसमोर मांडणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या पॅकेजमध्ये वनस्पतींसाठी पोषक तत्वे, वनस्पती वाढ-नियामक आणि पाण्याची कार्यक्षमता सुधारणारी आणि लागवडीचा खर्च कमी करण्यास मदत करणारी जैव सोल्युशन अशा अनेक प्रकारच्या इन्पुट्सचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पांडुरंग राऊत आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दत्ताराम रासकर, ‘शाश्वत मिठास’ प्रकल्पाचे प्रमुख व भारताचे ऊस पीक व्यवस्थापक प्रमुख श्री. हर्षल सोनवणे, आणि अन्य मान्यवरांची उपस्थित होते. या कार्यक्रमाला २५ पेक्षा जास्त गावांतील तब्बल २०० शेतकऱ्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी एआरडीएस शुगरकेन प्रोन्यूटिवा प्लॉटला (ARDS Sugarcane Pronutiva Plot) भेट दिली आणि प्रोन्यूटिवा पॅकेज अंतर्गत नवीनतम शेती पद्धती शिकून आणि समजून घेतल्या. पॅकेज पद्धती एआरडीएस शास्त्रज्ञांद्वारे प्रमाणित केल्या आहेत, जेणेकरून शेतकरी या सोल्युशनच्या परिणामकारकतेवर विश्वास ठेवू शकतील. एकूण ५१ एकर प्रोन्यूटिवा किट शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले, ज्यामुळे त्यांना शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करता येणे शक्य झाले आणि पीक उत्पादनात सुधारणा करता आली.
या कार्यक्रमात बोलताना अजित चौगुले, कार्यकारी संचालक, वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन म्हणाले, “यूपीएल आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना शाश्वत शेतीसाठी ठोस पावले उचलताना पाहून आम्हाला आनंद होत आहे. ‘शाश्वत मिठास’ प्रकल्प एक उत्तम उपक्रम आहे, जो केवळ स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेच णाही तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मदत करतो. आम्हाला खात्री आहे की, प्रोन्यूटिवा पॅकेज पद्धतींचा अवलंब केल्याने पाणलोट क्षेत्रातील शेतकरी त्यांचे उत्पादन वाढवू शकतील आणि जमिनीचे आरोग्य सुधारू शकतील.”
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या योजनांवर प्रकाश टाकताना यूपीएलचे भारत क्षेत्राचे संचालक श्री. आशिष डोभाल म्हणाले, “यूपीएलने शाश्वत मिठास प्रकल्पात १०,००० एकर क्षेत्राची नोंदणी करण्याचे आणि कारखान्याच्या पाणलोट क्षेत्रात शाश्वत पद्धतीने ऊसाच्या पीकाच्या उत्पादनात १०% ते १५% वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मातीच्या आरोग्य सुधारणेवर लक्ष केंद्रित करणे, यूपीएल यांत्रिकीकरणाचा वापर करून लागवडीचा खर्च कमी करणे आणि लागवडीसाठी आणि खतांचे योग्य डोस देण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत स्वीकारणे, शाश्वत मिठास प्रकल्पाबाबत जनजागृती करण्यासाठी गाव पातळीवर हंगामापूर्वी शेतकऱ्यांच्या मेळाव्यांचे आयोजन करणे हे आमचे ध्येय आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना योग्य सल्ला व शाश्वत पद्धतींची माहिती देऊन सेटची किंमत, बियाणांपासून होणारे रोग आणि खतांना लागणारा खर्च कमी करण्यासाठी सुपर केन नर्सरीच्या वापरावर भर देण्याचे आणि झेबा तंत्रज्ञान वापरुन पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे आणि जमिनीचे लिचिंग किंवा निक्षालन होऊन पाण्याद्वारे जमिनीतील पोषकतत्वे कमी होऊन पिकाची गुणवत्ता कमी न होवू नये यासाठी प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे.”
आतापर्यंतच्या यशाबाबत बोलताना श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पांडुरंग राऊत म्हणाले, “आम्ही शाश्वत मिठास प्रकल्पाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही या प्रदेशात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या कारखान्याच्या परिसरात ५ बूम फवारा यंत्रे लावली आहेत, ज्याचा वापर १००० हून जास्त शेतकऱ्यांनी ऊस पिकांवर फवारणीसाठी केला आहे. या प्रकल्पाने गावपातळीवर शेतकरी मेळाव्याचे आणि फील्ड दिवस चे आयोजन करून १६०० शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले आहे. याशिवाय, काही शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सुपर केन नर्सरी सारखी नवीन वैज्ञानिक तंत्रे स्वीकारली आहेत; ज्यामुळे सेटची किंमत कमी होते आणि दर्जेदार रोपे मिळण्यास मदत होते.”
शाश्वत मिठासचा एक भाग म्हणून साखर कारखान्याच्या ७ ब्लॉक्समध्ये २० प्रोन्यूटिवा मॉडेल प्लॉट तयार करण्यात आले आणि प्रोन्यूटिवा पॅकेजचे परिणाम प्रदर्शित करण्यासाठी तीन प्लॉट्सवर फील्ड दिवस आयोजित करण्यात आले. परिणामी, ४०० शेतकऱ्यांनी एकूण प्रोन्यूटिवा पॅकेजचा वापर १२०० एकर ऊस पिकांवर केला आणि पिकांची वाढ व त्यांचे आरोग्य व गुणवत्तेच्या दृष्टीने ते या प्रोन्यूटिवा पॅकेजच्या परिणामांवर अत्यंत समाधानी होते. या उपक्रमाला FICCI कडून आणि Bonsucro कडून शाश्वत ऊस उत्पादन मोहिमेसाठी प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ऊसाच्या शेतीमध्ये सशाश्वत उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक शेतकरी वर्गाला पाठिंबा देण्यासाठी यूपीएल च्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे शुगरकेन प्रोन्यूटिवा मेळावा. कंपनी नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे, जे शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढवण्यास, मातीचे आरोग्य सुधारण्यास आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत करते.