पत्रकार अश्विनी सातव डोके यांनी हाच व्हिडीओ शेअर केला जो फेसबुक ने प्रतिबंधित केला .Violent or graphic content. This video is covered, so people can choose whether they want to see it. दिले हे कारण

मुंबई-नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. झालेले मृत्यू हे उष्माघातामुळे कि चेंगराचेंगरीमुळे झाले? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल 7 लाख लोक सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने तसेच आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र या घटनेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक नेत्यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन राजकारण तापलेले असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. आव्हाड यांनी यात म्हटले आहे की, समाज माध्यमांमधून हा व्हिडिओ आला आहे. हा व्हिडिओ मॉर्फ नाही कारण, महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंगरीचा प्रकार कुठे घडला असावा?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
या व्हिडिओमध्ये एक महिला बेशुद्धावस्थेत पडलेली दिसत आहे. भयानक गर्दीमुळे लोकांना पुढे जायला रस्ता मिळत नाही. अनेकजण या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. चेंगराचेंगरीमुळे खाली पडलेल्या काही महिला या जमिनीवर निपचित पडलेल्या दिसत आहेत. या गर्दीसोबतच रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकू येत असतो. या रुग्णवाहिकेला पुढे जायला रस्ता देखील मिळत नाही. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ फिरत आहे.

