पुणे- शहरात पुणे महानगरपालिकेने वेताळ टेकडी येथे प्रस्तावित केलेल्या बालभारती ते वनाज या नव्या रस्त्याच्या कामास शहरातील पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवला आहे.या कामामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असून वेताळ टेकडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन, पर्यावरणाची खूप मोठी हानी होणार आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
शहारात विकास नक्कीच व्हायला हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान होवून नाही, ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका असुन पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते शनिवारी होणा-या टेकडी बचाव कूती समितीच्या बालभारतीपासून निघणा-या मोर्चात सहभागी होणार आहेत.
या बैठकीसाठी खा.वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, दीपक मानकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड,, रवींद्र माळवदकर, निलेश निकम , उदय महाले,हर्षल मानकर व पदाधिकारी उपस्थित होते.
विकास हवाय परंतु पर्यावरणाचे नुकसान करून नको -राष्ट्रवादीची बालभारती पौड रस्ताबाबत भूमिका
Date:

