कर्नाटक विधानसभेच्या प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांची फौज

Date:

पुण्यातील रमेश बागवे, दीप्ती चौधरी, अभय छाजेड, संजय बालगुडे यांचा समावेश

मुंबई, दि. १३ एप्रिल २०२३
कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागासाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून १० मे राजी मतदान व १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनेही स्टार प्रचारकांबरोबरच इतर प्रचारकांची एक मोठी फौज उभी केली आहे. हे प्रचारक कर्नाटकातील विविध मतदारसंघात जाऊन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतील.
महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रचारकांच्या यादीत प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री रमेश बागवे, दीप्ती चौधरी, अभय छाजेड, संजय बालगुडे, सिद्धराम म्हेत्रे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे भानुदास माळी, एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एनएसयुआमचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांच्यासह सरचिटणीस, सचिव, प्रवक्ते व पदाधिकारी यांची ५१ सदस्यांची टीम बनवली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत प्रचारासाठी महाराष्ट्रातून जाणारी ही प्रचारकांची टीम मराठी बहुल भागासह कर्नाटकच्या इतर मतदारसंघातही जोमाने प्रचार करतील.

– सोबत प्रचारकांची यादी

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...