महाबळेश्वर पर्यटनाच्या आनंदावर विरजण

Date:

पुणे- बेकायदेशीर बांधकामे करून हॉटेल्स थाटा आणि मनमानी किंमती आकारून सरार्स ग्राहकाची लुट करा असे धोरण स्वीकारत तुंबडी भरणाऱ्या प्रवृत्तीमुळे महाबळेश्वरच्या पर्यटनाचा खेळ आता प्रचंड गर्दीमुळे,आणि अशा बांधकामामुळे लयास जाऊ लागला आहे. महाबळेश्वर मध्ये आता काय उरलंय ? फक्त महागाई आणि गर्दी..असे म्हणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.

महाबळेश्वरच्या अशा अनधिकृत बांधकामांना खरे तर प्रशासनाने नोटीसा दिल्या आहेत, ज्याची एकूण बांधकामांच्या तुलनेत ९० टक्के एवढी संख्या असेल आणि हि सारी हॉटेल व्यावसायिकांची बांधकामे आहेत.यावर कारवाई चा प्रारंभ धडाक्यात करण्यात आला होता, मात्र त्यानंतर हि सारी हॉटेल व्यावसायिक मंडळी राजकीय पुढाऱ्यांच्या दारात जाऊन बसली.आणि मग कारवाई राजकीय दबावाखाली संथ होत गेली.प्रशासनाने येथे नंतर पाडकामा ऐवजी पाणी बंद करणे, वीज पुरवठा बंद करणे अशा बाबी सुरु केल्या पण त्यास हि मानवतेचा आधार घेत विरोध करून त्या कारवाया देखील बंद पाडण्यात आल्या.ऑनलाईन बुकिंग हा येथील हॉटेल्स मध्ये गर्दी करणारा सर्वात मोठा प्रकार असून सर्व बेकायदा हॉटेल्स ऑनलाईन बुकिंगवर माय गोळा करून एका हॉटेल्स चे २ ; २ चे ३ हॉटेल्स उभारू लागली आहेत.

सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर, पांचगणी या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.ऐन उन्हाळ्यात पाऊस,धुके, थंडी,ऊन, ढगाळ वातावरण असे वेगळे पण आल्हाददायक वातावरण पर्यटक अनुभवण्यास येत आहेत.या थंड हवेच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारनंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागते पण हीच गर्दी नंतर पर्यटनाच्या आनंदावर विरजण टाकू लागली आहे.वाहतुकीची समस्या.पार्किंगला जागा पुरेनासी झाली आहे.गाड्यांनी प्रदूषणाचा टप्पा ओलांडण्यास सुरुवात केली आहे.महाबळेश्वरच्या सोंदर्य आणि निसर्गास बाधा येऊ लागली आहे. शनिवारी, रविवारी सकाळपासून २५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वर, पांचगणी तुडुंब भरले होते. मागील दोन-तीन महिन्यांच्या परीक्षा काळानंतर पहिल्यांदाच पर्यटक या गिरीस्थळी येत असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक पर्यटकांचे स्वागत करत आहेत. महाबळेश्वर पर्यटन स्थळाचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी मोठी गर्दी हाेत आहे.चौपाटीवर मका कणीस, मका फ्रँकी अशा पदार्थांवर ताव मारण्यासह आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी व आईसगोला, स्ट्रॉबेरी विथ क्रीमसारख्या पदार्थांची चव चाखताना दिसत आहेत.येथील केट्स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, विल्सन, मुंबई पॉइंट, क्षेत्र महाबळेश्वर, लॉडविक पॉइंट, लिंगमाळा धबधबा, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, किल्ले प्रतापगड येथे पर्यटक गर्दी करीत आहेत,पण कोणालाही निसर्गाच्या सानिध्यात अलगता मिळेनासी झाली आहे आजूबाजूला गर्दीचे मळे फोटोत दिसू लागले आहेत.त्यामुळे आता प्रशासनाने या ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पोर्टल्सवर बेकायदा बांधकामे,आणि हॉटेल परवाने असलेल्यांच्या जाहिराती करू नका असे धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...