पुणे : व्ही. के. कृष्णमेनन इनडोर स्टेडियम कोझिकोड केरळ येथे झालेल्या खुल्या राष्ट्रीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी नवीन नॅशनल रेकॉर्ड सह सुवर्णपदक पटकावले. मास्टर खेळाडू म्हणजेच चाळीस वर्षापुढील गट असूनही ओपन- सीनियर गटामध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या पाॅवरलिफ्टिंग इंडियातील त्या पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत.

शर्वरी इनामदार यांनी ३६७.५ किलो वजन उचलून नवीन नॅशनल रेकॉर्ड सह सुवर्णपदक पटकावले. त्यांना केरळ, कर्नाटक, हरियाणा, गोवा, मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड ,आंध्र प्रदेश आदि खेळाडूंशी कडवी झुंज द्यावी लागली.
ओपन- सीनियर गटामध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकाविणाऱ्या पाॅवरलिफ्टिंग इंडियातील पहिल्या खेळाडू ठरल्या आहेत. सर्व वजनी गटातून आय.पी. एफ.- जी. एल. फॉर्मुलानुसार जास्तीत जास्त वजन उचलणाऱ्या खेळाडूला बेस्ट लिफ्टर ऑफ इंडिया हा किताब बहाल केला जातो. स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडिया म्हटला जाणारा हा बेस्ट लिफ्टरचा किताबही त्यांनी या स्पर्धेत खेचून आणला.
शर्वरी इनामदार या कोडब्रेकर व्यायाम शाळा ही जिम व आहार आयुर्वेद हे न्यूट्रिशन क्लीनिक चालवतात. यावर्षी पार पडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण भारतातून कौतुक होत आहे.

