वेताळ टेकडीवरुन मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील आमने सामने

Date:

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेताळ टेकडीवरून प्रस्तावित रस्त्यासाठी निविदा काढण्याचा आदेश दिला आहे, तर माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र हा रस्ता होऊ नये, असा पवित्रा घेतला आहे.

वेताळ टेकडीवरून बालभारती-पौड रस्ता प्रस्तावित आहे. त्याला पुणेकर व टेकडीप्रेमींचा जोरदार विरोध आहे. या रस्त्यामुळे टेकडीचे नुकसान होणार आहे. त्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समिती काम करत आहे. त्यांनी नुकतीच मेधा कुलकर्णी आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यात रस्त्याला मेधा कुलकर्णी यांनी जोरदार विरोध केला आहे. दरम्यान दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र या रस्त्याची निविदा लवकर काढा असे म्हणत आहेत. त्यामुळे भाजपमधील दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. नागरिकांचा मेधा कुलकर्णी यांना मोठा पाठिंबा आहे. टेकडी वाचविण्यासाठी सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या रोषाला चंद्रकांत पाटील यांना सामोरे जावे लागणार आहे.

पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत विक्रमकुमार म्हणाले होते की, टेकडीला खूप नुकसान होऊ नये म्हणून उड्डाणपूल करत आहोत. त्यावर मेधाताई म्हणाल्या होत्या की, खालून नको आणि वरून नको. टेकडीवरून रस्ताच नको. टेकडीचे काहीच नुकसान करायचे नाही.” यावरून मेधाताई यांची भूमिका स्पष्ट होत आहे.
वेताळ टेकडीवरून बालभारती रस्ता आणि अजून दोन बोगदे प्रस्तावित आहेत. या तिन्ही प्रकल्पांमुळे टेकडीचे मोठे नुकसान होणार आहे. हजारो झाडे तोडली जातील. तिथे पक्ष्यांचा अधिवास आहे. तो नष्ट होणार आहे. म्हणून टेकडी वाचविण्यासाठी नागरिक तिन्ही प्रकल्पांना विरोध करत आहेत. मेधा कुलकर्णी यांनी देखील याला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...